जेव्हा डायन ‘आँख मारे’

डायन मालिकेत मोनालिसा

सिम्बा सिनेमातील ‘आँख मारे’ या गाण्याने सगळीकडे धूम माजवली आहे . हे काही नव्याने सांगायला नको. या गाण्यावर अनेक व्हिडिओ येत आहेत. पण एक व्हिडिओ सगळ्याचे लक्ष वेधून आहे. चक्क डायन या गाण्यावर थिरकताना दिसत आहे. ही डायन साधीसुधी नसून नजर या मालिकेतील मोनालिसा आहे. ती आँख मारे या गाण्यावर थिरकली आहे. जरीनाचा हा डान्स तुम्ही एकदा तरी पाहिलाच हवा.

‘ओ लडकी आँख मारे’

मोनालिसाने हा व्हिडिओ तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर केला आहे. यात मोनालिसा या मालिकेतील तिची सहकलाकार हिच्या सोबत ठुमके लावत आहे. मोनालिसा या व्हिडिओमध्ये तिच्या नजर मालिकेतील अवतारात दिसत आहे. म्हणजे तिची स्टाईल अर्थात वेणी आणि पंजाबी ड्रेसच्या लूकमध्ये दिसत आहे. तर तिची को-स्टार साडीमध्ये दिसत आहे. दोघी या गाण्याचा आनंद लुटत आहे.

कोण आहे मोनालिसा?

मोनालिसा एक भोजपुरी अभिनेत्री आहे. मोनालिसा बिग बॉसमध्येदेखील होती. तिने बंगाली कॉमेडी असलेल्या Dupur Thakurpo Season 2 मध्ये देखील काम केली आहेत. मोनालिसाने डायनमध्ये एक वेगळी भूमिका केली आहे. सध्या ‘नजर’ या मालिकेने १०० भाग पूर्ण केले आहेत. त्याचेही काही फोटो मोनालिसाने इन्स्टावर शेअर केलेले आहेत.

 

First Published on: December 30, 2018 3:51 PM
Exit mobile version