मनी लाँड्रिंगप्रकरणी चित्रपट निर्माती प्रेरणा अरोरा अडचणीत; ईडीकडून गुन्हा दाखल

मनी लाँड्रिंगप्रकरणी चित्रपट निर्माती प्रेरणा अरोरा अडचणीत; ईडीकडून गुन्हा दाखल

बॉलिवूड चित्रपट निर्माती प्रेरणा अरोरा चांगलीच अडचणीत सापडली आहे. ईडीने तिच्याविरोधात मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल केला आहे. 31 कोटी रुपयांच्या फसवणुकी प्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रेरणा अरोराविरोधात ईडीने समन्स जारी केला होता. मात्र प्रेरणा ईडीसमोर हजर झाली नाही. तिच्या वतीने वकील विवेक वासवानी हे ईडी कार्यालयात पोहचत वेळ मागून घेतला. यावेळी वकील वासवावी यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रेरणा कामानिमित्त मुंबईबाहेर असल्याने ती चौकशीला हजर राहू शकत नाही, त्यामुळे ईडीने तिला वेळ वाढवून द्यावा.

अनेक फायनान्सरचे पैसे परत न करत आर्थिक फसवणूक केल्याचा आरोप प्रेरणा अरोराविरोधात करण्यात आला आहे. दरम्यान वासु भगनानी प्रोडक्शन कंपनीने देखील प्रेरणाविरोधात नोटीस जारी केली, ज्यात वासु भगनानी यांनी प्रेरणासह तिची आई आणि क्रिआर्ज एंटरटेनमेंटच्या भागीदाराविरोधात तक्रार दाखल केली, ज्यात भगनानींनी प्रेरणाला 31.6 कोटी रुपये त्वरित परत करण्याची मागणी केली आहे. याप्रकरणी प्रेरणाविरोधात मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रेरणाने अनेक निर्मात्यांसोबत संपर्क तोडल्याचे माहिती समोर येत आहे.

प्रेरणाला 2018 मध्येही केली होती अटक

कोट्यावधींच्या मनी लाँड्रिंगप्रकरणी 2018 मध्ये प्रेरणा अरोराला अटक करण्यात आली होती. मात्र आठ महिन्यांनी ती जामीनावर बाहेर आली. यानंतर तिने चुक मान्य करत, नव्या आयुष्याला पुन्हा सुरुवात करेन असे एका मुलाखतीत म्हटले होते. मात्र मनी लाँड्रिंग प्रकरणात प्रेरणाविरोधात नवा गुन्हा समोर आला आहे. प्रेरणा अरेराने बॉलिवूडमधील पॅडमॅन, परी आणि टॉयलेट एक प्रेमकथा अशा अनेक हिट चित्रपटांची निर्मिती केली आहे.


मोदी सरकारचे राजकारणाकडे लक्ष, भारताची परिस्थिती श्रीलंकेसारखी? राष्ट्रवादीचा हल्लाबोल


First Published on: July 20, 2022 3:09 PM
Exit mobile version