सुशांतच्या स्मरणार्थ एकताने सुरू केला ‘पवित्र रिश्ता फंड’

सुशांतच्या स्मरणार्थ एकताने सुरू केला ‘पवित्र रिश्ता फंड’

सुशांतच्या स्मरणार्थ एकताने सुरू केला ‘पवित्र रिश्ता फंड’

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या निधनाला एक महिना पूर्ण झाला आहे. दरम्यान निर्माती आणि दिग्दर्शिक एकता कपूरने सुशांतची आठवण म्हणून एक मोठी घोषणा केली आहे. तिने सुशांतला श्रद्धांजली देते मानसिक आरोग्याविषयी जागरुकता निर्माण करण्यासाठी फंड सुरू करण्याची घोषणा केली आहे. या फंडाचे नाव ‘पवित्र रिश्ता फंड’ असे देण्यात आले आहे.

याबाबत एकता कपूर म्हणाली की, ‘गेल्या १० वर्षात खूप बदल झाले आहेत. आज प्रत्येक गोष्टीचे प्रेशर आपल्यावर असते. सध्या कोरोनामुळे आपण सर्व लोकं घरी कैद होऊ बसलो आहोत. यादरम्यान तणाव आणि नैराश्याचा सामना करावा लागत आहे. काम, घर, नोकरी इत्यादींमुळे तणावात वाढ होत आहे. या कारणामुळे अनेक लोकांचे मानसिक आरोग्य बिघडले आहे. त्यामुळे आम्ही ‘पवित्र रिश्ता’ या फंडाच्या माध्यमातून मानसिक आजारांशी लढणाऱ्या लोकांना मदत करणार आहोत. मी ‘पवित्र रिश्ता फंड’चा एक भाग असल्यामुळे खूश आहे. अशाप्रकारे पुढील उपक्रमांत भाग घेऊन मी खूश राहिल. या फंडाचे उद्दीष्ट मानसिक आरोग्याबद्दल लोकांमध्ये जनजागृती करणे आहे.’

निर्माती आणि दिग्दर्शिक एकता कपूरने सुशांतला इंडस्ट्रीमध्ये लाँच केले आहे. सुशांतने एकताच्या ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेडून आपल्या अभिनय कारकीर्दीची सुरुवात केली. यामध्ये अंकिता लोखंडेसोबत सुशांत दिसला होता. या मालिकेमुळे सुशांतला खूप लोकप्रियता मिळाली होती. या मालिकेच्या सेटवर सुशांत, अंकिता आणि एकतामध्ये खूप चांगली बॉन्डिंग झाली होती. सुशांतच्या निधनाला एक महिना पूर्ण झाल्यावर एकताने सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट टाकली होती.


हेही वाचा – मुंबईतील ‘या’ रस्त्याला दिले जाणार सुशांतचे नाव?


 

First Published on: July 17, 2020 2:41 PM
Exit mobile version