एकताचे ‘हे’ चेहरे बॉलिवूडमध्ये सुपरहिट

एकताचे ‘हे’ चेहरे बॉलिवूडमध्ये सुपरहिट

एकता कपूर

चित्रपट आणि मालिका निर्माती एकता कपूर आज आपला वाढदिवस साजरा करत आहे. टीव्ही मालिकांच्या निर्मितीपासून सुरूवात केलेल्या एकताने कालांतराने बॉलिवूड चित्रपटांच्या निर्मितीला सुरूवात केली. चित्रपटांच्या निर्मितीतही एकता कपूरने आपला दबदबा कायम ठेवला. तिच्याप्रमाणेच तिच्या मालिकांमध्ये झळकलेल्या या कलाकारांनी आज बॉलिवूडमध्ये आपले वर्चस्व निर्माण केले आहे. जाणून घेवूयात या अभिनेत्रींविषयी

विद्या बालन 

अभिनेत्री विद्या बालनची बॉलिवूडमधील आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये गणना होते. वयाच्या अवघ्या १६ व्या वर्षी विद्याने एकता कपूर निर्मीत हम पॉंच मालिकेत भूमिका केली होती. त्यानंतर बॉलिवूडचा मार्ग स्विकारलेली विद्याने अनेक हिट सिनेमा दिले.

प्राची देसाई

अभिनेत्री प्राची देसाईच्या प्रसिद्धीमागेदेखील एकताताच हात आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. एकता कपूर निर्मीत कसम से या मालिकेमधून प्राची घराघरात पोहोचली. बॉलिवूडमध्ये पदार्पण करताच प्राचीने येथील आघाडीच्या कलाकारांबरोबर काम करण्यास सुरूवात केली.

सुशांत सिंह राजपूत 

अभिनेता सुशांत सिंहची आज बॉलिवूडमधील टॉप अभिनेत्यांमध्ये गणना होते. मात्र सुशांतनेदेखील अभिनयाची सुरूवात मालिकांमधूनच केली आहे. अभिनेता सुशांत सिंह राजपूतने किस देश में है मेरा दिल मध्ये सुरूवातीला काम केले. त्यानंतर एकता कपूरच्या पवित्र रिश्ता या हिट मालिकेमुळे त्याला बॉलिवूडचे दरवाजे उघडले.

रोनित रॉय

वर्ष २००२ मध्ये बालाजी टेलिफिल्मस् च्या बॅनरखाली कमाल चित्रपटात दिसलेल्या अभिनेता रोनित रॉयला एकता कपूरच्या मि. बजाजच्या भूमिकेने ओळख मिळवून दिली. त्यानंतर रोनिला बॉलिवूडमध्ये काम करण्याच्या अनेक संधी प्राप्त झाल्या.

सुरविन चावला

अभिनेत्री सुरवीन चावलाने २००३ साली एकता कपूर निर्मित प्रसिद्ध मालिका कहीं तो होगा में काम केले. त्यानंतर तिला लगेचच बॉलिवूडचे दरवाजे उघडले.

First Published on: June 7, 2019 6:27 PM
Exit mobile version