कतरीनाच्या टिकेनंतरही दिसला जान्हवीचा तोच हॉट जीम लूक

कतरीनाच्या टिकेनंतरही दिसला जान्हवीचा तोच हॉट जीम लूक

जान्हवी कपूरचा नवीन जीम लूक

दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांची मोठी कन्या जान्हवी कपूर नेहमीच तिच्या जीम लुकमुळे सोशल मिडियावर चर्चेत असते. जान्हवीचा शॉर्ट्समधील कूल लूक समाज माध्यमावर तरूणांमध्ये चांगलाच प्रसिद्ध आहे. तिच्या कूल लूकची चर्चा केवळ समाजमाध्यमावरील नेटकऱ्यांमध्येच होते असे नाही तर बॉलिवूडकरांमध्येही जान्हवीच्या लूकवर चर्चा होत असल्याचे अनेकदा निदर्शनास आले आहे. मात्र ट्रोलर्सपासून ते अगदी बॉलिवूडकरांपर्यंत सर्वांनी टीका केली असली तरी जान्हवीने आपल्या जीम लूकमध्ये काहीही बदल न करता, जीमचा कूल लूक कायम ठेवला आहे.

कतरीना कैफने नेहा धूपियाच्या चॅट शोमध्ये जान्हवीच्या जीम लूकवर एक कमेंट केली होती. जान्हवी कपूरचा जीम लूक मला ओव्हर द टॉप वाटत नाही. तिचे छोटे शॉर्ट मला आवडत नाहीत, असे कतरीनाने सांगितले होते. कतरीनाच्या या कमेंटला जान्हवी कपूरची चूलत बहिण सोनम कपूरने आपल्या इन्स्टा स्टोरीने उत्तर दिले होते. आता जान्हवीनेसुद्धा आपला हॉट जीम लूक कायम ठेवत ट्रोलर्सना समर्पक उत्तर दिले आहे. या जीम लूकमध्ये जान्हवीने निळ्या रंगाच्या शॉर्ट्सवर गुलाबी रंगाचा टीशर्ट घातला आहे. या जीम लूकमध्ये जान्हवी नेहमीप्रमाणे हॉट दिसत आहे.

 

जान्हवी कपूरचा जूना हॉट जीन लूक

 

First Published on: June 4, 2019 6:51 PM
Exit mobile version