सुप्रसिद्ध बॉलिवूड निर्माते राजकुमार बडजात्या यांचे निधन

सुप्रसिद्ध बॉलिवूड निर्माते राजकुमार बडजात्या यांचे निधन

निर्माते राजकुमार बडज्यात्या यांच निधन

सुप्रसिद्ध निर्माते राजकुमार बडजात्या यांचे आज सकाळी मुंबईत निधन झाले आहे. दिग्दर्शक सूरज बडजात्या यांचे ते वडील होते. त्यांच्या पश्चात पत्नी सुधा बडजात्या आणि मुलगा सूरज बडजात्या असा परिवार आहे. आज सकाळी मुंबईच्या हरकिसनदास रिलायन्स फाऊंडेशन रूग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या जाण्याने बॉलिवूड जगतावर शोककळा पसरली आहे. राजश्री प्रोडक्शनचे ते संस्थापक होते. अनेक अजरामर हिंदी चित्रपटांची त्यांनी निर्मिती केली.

‘राजकुमार बडजात्या’ यांचा प्रवास

 

आपल्या राजश्री प्रोडक्शनच्या माध्यमातून ७० ते ९० च्या दशकात त्यांनी अनेक दर्जेदार चित्रपटांचा खजिना रसिक प्रेक्षकांना दिला. ‘हम आपके है कोन’, ‘हम साथ साथ है’, ‘गीत गाता चल’, ‘मैने प्यार किया’, ‘विवीह’, ‘पिया का घर’ ते ‘प्रेम रतन धन पायो’ अशा अनेक दर्जेदार चित्रपटांची त्यांनी निर्मिती केली. मागच्या महिन्यात ‘हम चार’ हा ‘राजश्री प्रोडक्शनचा’ राजकुमार यांची निर्मिती असलेला शेवटचा चित्रपट ठरला.

First Published on: February 21, 2019 11:21 AM
Exit mobile version