युट्यूबच्या लाडका दादुस विनायक माळीला कोरोनाची लागण

युट्यूबच्या लाडका दादुस विनायक माळीला कोरोनाची लागण

युट्यूबच्या लाडका दादुस विनायक माळीला कोरोनाची लागण

राज्यात कोरोना विषाणूने फैलाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. दिवसेंदिवस कोरोना बाधितांची संख्या वाढ आहे. कोरोनाचा फटका सर्व क्षेत्राला बसला आहे. नेते मंडळींपासून अनेक सेलिब्रिटांना कोरोनाची लागण झाली आहे. आता महाराष्ट्राचा लाडका दादुस विनायक माळी कोरोना पॉझिटिव्ह आढळला असल्याचे समोर आले आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून स्वतः विनायकने याबाबतची माहिती दिली आहे. विनायक हा प्रसिद्ध युट्यूबर आणि आगरी कॉमेडीअन आहे.

विनायक माळीने आपल्या फेसबुक पोस्टमध्ये कोरोना चाचणीचे रिपोर्टचा फोटो पोस्ट करून चाहत्यांना कोरोना झाल्याबाबत सांगितले आहे. त्याने फेसबुकवरून चाहत्यांना सांगितले की, ‘शरीरात नकोसा असलेला विषाणू आढळल्याने कामापासून थोडा ब्रेक घेत आहे. तसेच सर्व लोक बरे होत असून माझी अवस्था बेकार झाली आहे.’

विनायकाला कोरोना झाल्याचे कळताच चाहत्यांनी त्याच्या प्रतिक्रियेच्या माध्यमातून उत्तम आरोग्याची प्रार्थना केली आहे. तसेच लवकर बरा व्हावा अशी इच्छा व्यक्त केली आहे.

दरम्यान युट्यूबवर पाहायला गेले तर क्वचित मराठी विनोदी चॅनलेस आहेत, ज्याच्या माध्यमातून प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. त्यापैकी एक विनायकचे चॅनेल आहे. विनायकच्या युट्यूब चॅनलेवर आगरी भाषेत कॉमेडी व्हिडिओ असतात. जे प्रेक्षकांना प्रचंड आवडतात आणि मोठ्या प्रमाण ते व्हिडिओ शेअरही होत असतात. पण आता विनायकाला कोरोना झाल्याने तो कामातून त्याने ब्रेक घेतला आहे. विनायकाचा युट्यूब चॅनेला १.१८ मिलियन सबस्क्रायबर्स आहेत. तीन वर्षांपासून विनायक या युट्यूब चॅनेलवर व्हिडिओ पोस्ट करत आहे. आगरी भाषे व्यक्तिरिक्त हिंदी भाषेत देखील व्हिडिओ पोस्ट त्याने केले आहेत. विनायकला ‘आगरी किंग’ म्हणून ओळखले जाते.

First Published on: August 13, 2020 2:35 PM
Exit mobile version