‘फन्ने खाँ’मध्ये ऐश्वर्याची ‘जवाँ है मोहब्बत’

‘फन्ने खाँ’मध्ये ऐश्वर्याची ‘जवाँ है मोहब्बत’

ऐश्वर्या राय बच्चन (सौजन्य - युट्यूब)

अनेक वर्षांनंतर ऐश्वर्या राय बच्चन आणि अनिल कपूर मोठ्या पडद्यावर एकत्र येत आहे. सध्या ‘फन्ने खाँ’ची सगळीकडेच चर्चा आहे. या चित्रपटातील पहिलं गाणं प्रदर्शित करण्यात आलं असून, ‘जवाँ है मोहब्बत’ असे गाण्याचे बोल आहेत. या गाण्यात ऐश्वर्या एका रॉकस्टारच्या भूमिकेत दिसत आहे. या चित्रपटाचं ट्रेलर प्रेक्षकांना भावलं आहे. ऐश्वर्या राय बच्चन या चित्रपटात एका प्रसिद्ध बेबी सिंह नावाच्या रॉकस्टार गायिकेची भूमिका साकारत आहे. बेबी अशी सुपरस्टार आहे जिचं प्रत्येक गाणं सुपरहिट होतं. त्यामुळं तिचा शो असलेलं गाणं प्रदर्शित करण्यात आलं आहे.

काय आहे गाण्याची खासियत?

हे गाणं सुनिधी चौहाननं गायलं आहे. तर, ईर्शाद कामिलनं लिहिलं आहे. याचं संगीत तनिष्क बाग्चीनं दिलं आहे. या चित्रपटात अनिल कपूर आणि ऐश्वर्यासह राजकुमार रावचीदेखील महत्त्वाची भूमिका आहे. ‘फन्ने खाँ’ ची भूमिका अनिल कपूर साकारत असून स्वतः चांगला गायक असूनही काही बनू न शकल्यामुळं आपल्या मुलीला जबरदस्त गायिका बनवण्याचं स्वप्नं पाहणारा बाप आहे. त्याला स्वतःचा अल्बमही रिलीज करायचा आहे. परंतु तो रिक्षाचालक असून मुलीचं स्वप्नं कशा प्रकारे साकारणार याबाबत हा चित्रपट आहे. हा चित्रपट ३ ऑगस्टला प्रदर्शित होणार असून ‘जवाँ है मोहब्बत’ हे पहिलंच गाणं प्रदर्शित करण्यात आलं आहे.

ऐश्वर्या ‘द रॉकस्टार’

ऐश्वर्यानं नेहमीप्रमाणेच या गाण्यातही आपला नेहमीचा अंदाज प्रेक्षकांना पुन्हा एकदा दाखवून दिला आहे. एका रॉकस्टारच्या भूमिकेत ऐश्वर्या आहे, हे गाण्यातून सहज प्रेक्षकांच्या लक्षात येईल. कमी कालावधीतच या गाण्याला ७२ लाखांपेक्षा अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. लवकरच हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर काय कमाल करणार हे प्रेक्षकांना कळेल.

First Published on: July 12, 2018 8:33 AM
Exit mobile version