फराह खानची व्हिलचेअर डायरी

फराह खानची व्हिलचेअर डायरी

सोनू निगम आणि व्हिलचेअरवर बसलेली फराह खान

बॉलीवूडची प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शिका आणि दिग्दर्शक फराह खान सध्या व्हिलचेअरवर घरी आहे. तिच्या या अवस्थेमध्ये तिचे इंडस्ट्रीमधील मित्रमैत्रिणी तिला भेटायला येत आहेत. दुखापत झाली असली तरीही रडत न बसता आपल्याला भेटायला येणाऱ्या आपल्या मित्रमैत्रिणींना फराह तिच्या तडफदार शैलीत व्हिलचेअरवर बसवून आपल्या इन्स्टावरून फोटो अपलोड करत आहे.

‘मैं हू ना’ फेम अभिनेत्री अमृता राव

आतापर्यंत तिने अमृता राव, सोनू सूद, मिनी माथुर, झैयद खान, दिग्दर्शक पुनीत मल्होत्रा, अनिल कपूर आणि सुनीता कपूर यांना व्हिलचेअरवर बसवले आहे. मात्र सोनू निगम तिला भेटायला आल्यानंतर त्याला या व्हिलचेअरवर बसवण्यात तिला अपयश आल्याचे तिने सांगितले. उलट सोनू निगमनेच तिला व्हिलचेअरवर बसवून सुपरहिट गाणं ‘मेरी दोस्ती मेरा प्यार’ गात व्हिलचेअरवरून फिरवून आणल्याचा व्हिडिओ फराहाने आपल्या इन्स्टावरून पोस्ट केला आहे. सध्या हा व्हिडिओ व्हायरल होत असून ‘जेव्हा तुम्हाला घरी भेटायला मोठी माणसं येतात, माय डिअर फ्रेंड सोनू’ अशा तऱ्हेचे कॅप्शनदेखील फराहाने दिलेले दिसते आहे. हा व्हिडिओ सध्या जास्त प्रमाणात बघितला जात असून फराहने इतर मित्रमैत्रिणींचे पोस्ट केलेले फोटोदेखील व्हायरल होत आहेत. ज्यामध्ये तिच्या मित्रमैत्रिणी व्हिलचेअरवर बसून विविध तऱ्हेने फोटो काढत आहेत.

अनिल कपूर आणि सुनीता कपूर

काही दिवसांपूर्वी मुंबईतील एका स्टुडिओमध्ये फराहा शूटिंग करत होती. वॅनिटीमध्ये येत असताना तिच्या पायाला दुखापत झाल्यानंतर फ्रॅक्चर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. सध्या तिला बेडरेस्ट करण्याचा आणि योग्य वेळेवर औषध घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

 

 

First Published on: May 21, 2018 9:54 AM
Exit mobile version