फरहानच्या ‘त्या’ ट्वीटवर चाहत्यांनी काढली लाज, म्हणाले…..

फरहानच्या ‘त्या’ ट्वीटवर चाहत्यांनी काढली लाज, म्हणाले…..

लसीची वाढती किंमत विचारताच, फरहान अख्तर झाला ट्रोल

देशात आज सातव्या टप्प्यातील मतदान सुरू आहे. गेले दोन महिने संपूर्ण देशात निवडणूकीचे वारे वाहत आहेत. सामान्य नागरिकांपासून ते अगदी सेलिब्रेटींपर्यंत सगळ्यांनीच आपला मतदानाचा हक्क बजावला. लोकांना सेलिब्रेटी ‘मतदान करा’ असे आवाहन करतात. मात्र हे आवाहन करताना फरहानची चांगलीच गोची झाली आहे. त्यांनी केलेल्या मतदानाच्या आवाहनावर नेटकऱ्यांनी त्याला चांगलेच ट्रोल केले आहे.

फरहान अख्तरने काल भोपाळच्या लोकांना ट्वीटकरून मतदान करण्याचं अवाहन केलं आहे. फरहानने ‘भोपाळच्या मतदारांनो, तुमच्या शहराला आणखी एका वायूकांडापासून वाचवण्याची हीच वेळ आहे,’ असे ट्वीट फरहानने केले आहे. मात्र या ट्वीटमुळे फरहानला ट्रोल व्हावे लागले आहे.

या ट्वीटद्वारे त्याने भोपाळच्या नागरिकांना मतदान करण्याचे आवाहन तर केले; पण भोपाळमध्ये १२ मेलाच मतदानाचा पार पडले आहे हे तो विसरला. यानंतर फरहान सोशल मीडियावर चांगलाच ट्रोल झाला.

 

अभिनेत्री शिबानी दांडेकर हिच्यासोबतचा त्याच्या लव्ह लाईफमुळे सध्या तो चर्चेत आहे. लवकरच फरहान आणि शिबानी लग्न करणार, असेही म्हटले जात आहे. सध्या फरहान ‘स्काय इज पिंक’ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये बिझी आहे. यात तो प्रियंका चोप्रासोबत दिसणार आहे.

First Published on: May 19, 2019 4:00 PM
Exit mobile version