फरहान शिबानीचे मालदिवच्या समुद्रात लीप लॉक, सोशल मीडियावर तुफान चर्चा

फरहान शिबानीचे मालदिवच्या समुद्रात लीप लॉक, सोशल मीडियावर तुफान चर्चा

बॉलिवूड अभिनेता फरहान अख्तर आणि अभिनेत्री शिबानी दांडेकर लग्नानंतर मालदिवला गेले आहेत. त्यांनी तेथील फोटो शेअर केले असून यातून दोघांचा रोमँटिक अंदाज दिसून येतोय. दोघांनीही समुद्राखाली स्कुबाडायव्हिंगचा आनंदा लुटला आहे. अंडर वॉटर डान्स करत लिप लॉक केले आहेत. (Farhan Shibani Leap Lock in Maldives Sea, post viral on social media)

अभिनेता फरहान अख्तर याने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर काही रोमँटिक फोटो आणि व्हिडिओज अपलोड केले आहेत. यामध्ये ते एकमेकांसोबत छान रमले असल्याचं दिसतंय. त्यांचा हा व्हिडीओ पाहून चाहत्यांना ‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’ची आठवण झाली.


सोशल मीडियावर त्यांनी त्यांची मालदीव जर्नी शेअर केली आहे. यामध्ये ते दोघंही एकमेकांसोबत खूप आनंदी दिसत आहेत. अंडरवॉटर जाऊन त्यांनी तिथला आनंद लुटला. तसंच, अंडरवॉटर किसही केलं. या दोघांचे हे रोमँटिक फोटो पाहून नेटिझन्सने त्यांच्यावर प्रेमाचा वर्षाव केला आहे. अगदी काही मिनिटांतच त्यांना भरपूर लाईक्स, कॉमेंट्स मिळाल्या आहेत.

First Published on: June 16, 2022 8:27 PM
Exit mobile version