Father’s Day 2021 Songs: ‘पापा मेरे पापा’,’डैडी कूल’आज सुद्धा फेमस आहेत हे बॉलिवुड साँग

Father’s Day 2021 Songs: ‘पापा मेरे पापा’,’डैडी कूल’आज सुद्धा फेमस आहेत हे बॉलिवुड साँग

Father’s Day 2021 Songs: 'पापा मेरे पापा'-'डैडी कूल' आज सुद्धा फेमस आहेत हे बॉलिवुड साँग

प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात आपल्या माता-पित्याला विषेश स्थान असतं. आई जरी भावनात्मक रित्या मुलाच्या जवळ असते असं म्हंटलं जात असलं तरिही प्रत्येक वडीलांचा आपल्या मुलावर तितकच प्रेम असतं. वडील हे एखाद्या शहाळा प्रमाणे असतात. वरुण दिसायला कडक, कणखर असले तरी आतून गोड पाण्याच्या झऱ्या प्रमाणे त्यांचे मुलांवर प्रेम असते. प्रत्येकासाठी आई-वडील हे नातं फार स्पेशल असतं. आई हे घराचं मांगल्य असते, तर वडील हे अस्तित्व असतात, असं अनेक ठिकाणी म्हटलं जातं. प्रत्येक वडील आपल्या मुलाच्या भविष्यासाठी ते दिवस रात्र मेहनत करत असतात. त्यांच्या सन्मानासाठी आज (21 जून) Fathers Day साजरा केला जात आहे. जगभरात जून महिन्यातील तिसऱ्या रविवारी Fathers Day साजरा केला जातो. (Father’s Day History). अशातच बॉलिवुड मधील काही अशी गाणी आहेत जी खास करुन वडील- मुलांच्या नात्यावर भाष्या करणारी घट्ट नात्याची जाण करुन देणारी आहेत. इतकेच नाही तर ती आज दखिल सदाबाहार तितकीच फ्रेश आहेत. फादर डे च्या निमित्ताने आपण अश्याच प्रसिद्ध सहाबाहार गाण्यांवर प्रकाश टाकूया.

बॉलिवुड ‘कयामत से कयामत तक’ मधिल ‘पापा कहते है बड़ा नाम करेगा’ आज सुद्धा खुप पॉपुलर आहे. तसेच अभिनेता अजय देवगनच्या सिनेमातील ‘मै ऐसा ही हूं’ मधील गाणं ‘पापा मेरे पापा’ आजची तरुण पीढीच्या मुखात देखील अनेकदा ऐकायला मिळतात

 

बॉलिवुड अभिनेता आमिर खान आणि अभिनेत्री मनीषा कोइराला यांची मुख्य भुमिका असणारा सिनेमा ‘अकेले हम अकेले तुम’ मधीलन साँग ‘अकेले हम अकेले तुम, जो हम तुम संग हैं तो फिर क्या गम.” आज सुद्दा प्रसिद्ध आहे.

अजय देवगनच्या सिनेमातील ‘मै ऐसा ही हूं’ मधील ‘पापा मेरे पापा’ हे गाणं वडीलांच्या प्रेमाचे स्पष्ट रुपाचे वर्णन करणारे आहे. या सिनेमात अजयने एका मानसिक आजाराने ग्रस्त वडीलांची भुमिका साकारली आहे. आणि तो मुलीच्या कस्टडी साठी कोर्टाचे खेटे घालतो.

फेमस ॲक्ट्रेस नेहा कक्कड़ तसेच तिचा भाऊ टोनी कक्कड़ यांच एक सुंगर गाण ‘पापा खुद सब सहते हो हमसे कुछ नहीं कहते हो’ हे ऐकूण प्रत्येकाचे डोळे पाणावतील.

फिल्म ‘दंगल’ मधील ‘नैनां’ हे गाणं लोकांद्वारे खुप पसंत केलं गेलं. हा सिनेमा पेहलवान गीता आणि बबिता फोगाट च्या आयुष्यावर आधारित आहे.


हे हि वाचा – Father’sDay2021:फादर्स डे ला नक्की पाहा’हे’पाच सिनेमा

First Published on: June 20, 2021 11:02 AM
Exit mobile version