फिल्मफेअरला गुटखा कंपनीचे प्रायोजकत्व; FDI ची नोटीस

फिल्मफेअरला गुटखा कंपनीचे प्रायोजकत्व; FDI ची नोटीस

फिल्मफेअर

अवघे बॉलिवूड ज्या मानाच्या पुरस्काराचे स्वप्न उराशी बाळगते, त्या फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्याची घोषणा बॉलिवूडचा अभिनेता रणवीर सिंग याने सोमवारी मुंबईत केली. ‘६४वा विमल फिल्मफेअर पुरस्कार २०१९’ सोहळा यंदा बीकेसी येथील जिओ गार्डनमध्ये सिने तारे-तारकांच्या उपस्थितीत रंगणार आहे. ‘यंदा विमल फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यात हिंदी चित्रपटसृष्टीतील उल्लेखनीय कामगिरी केलेल्या कलाकारांचा यथोचित सन्मान केला जाणार आहे. मात्र फिल्मफेअरचे प्रायोजक विमल ही तंबाखू उत्पादन करणारी कंपनी असल्यामुळे फिल्मफेअर वादात सापडण्याची शक्यता आहे.

मात्र यावर्षीच्या फिल्मफेअर सोहळा ‘विमल’ का निर्मिती करणार यावरून प्रश्न उपस्थित केला जात आहे. तंबाखूची निर्मिती करणाऱ्या विमल या कंपनीला यावर्षीचे फिल्मफेअरचे प्रायोजक म्हणून नेमण्यात आले आहे. याविरोधात अन्न आणि औषध प्रशासनाने फिल्मफेअरच्या मुख्यकार्यकारी आधिकारी यांना पत्राद्वारे विमल ला प्रायोजक असण्यावरून विचारले. शिवाय याचे योग्य स्पष्टीकरण न मिळाल्यास योग्य ती कारवाई करणार असल्याचेही सांगितले आहे.

२३ मार्चला हा सोहळा पार पडणार आहे. या पुरस्काराचे या वर्षीचे वैशिष्ट म्हणजे रणवीर सिंग या पुरस्कार सोहळ्याचा शो स्टॉपर असेल. या पुरस्काराविषयी बोलताना रणवीर म्हणाला, ‘फिल्मफेअर मासिकाच्या मुखपृष्ठावर स्वत:चा फोटो पहिल्यांदा होता. तेव्हा मला माझं स्वप्न पुर्ण झाल्यासारखं वाटलं. कारण फिल्मफेअरच्या नावातच एक वेगळी जादू आहे. जेव्हा माझा फोटो मालिकाच्या पृष्ठबागावर होता तेव्हा त्याच टायटल मला आजही आठवतं. त्यावर सिंग इज किंग असं लिहीलेलं होतं. हे मी कधीच विसरू शकत नाही.’ यंदाच्या फिल्मफेअरचे बॉलिवूडचा किंग खान शाहरूख खान या शानदार सोहळ्याचं सूत्रसंचालन करेल. तर सोहळ्याला विकी कौशल,क्रिती सेनन,जान्हवी कपूर,राजकपूर राव यांचे परफॉर्मन्स चार चांद लावतील.

 

First Published on: March 22, 2019 4:14 PM
Exit mobile version