मराठी चित्रपट महामंडळाच्या सभेत तुफान राडा!

मराठी चित्रपट महामंडळाच्या सभेत तुफान राडा!

अखिल भारतीय चित्रपट महामंडळ

दरवर्षीप्रमाणे या वर्षीही कोल्हापुरात अखिल भारतीय चित्रपट महामंडळाची वार्षिक सभा गोंधळातच पार पडली. सभेला सुरूवात होण्यापूर्वीच अध्यक्षांच्या प्रस्ताविकाआधीच सभासदांनी गोंधळ घालायला सुरूवात केली. त्यातील काही सभासदांना पोलिसांनी ताब्यातही घेतलं. सभेत वार्षिक कामांचा आणि भावी योजनांचा आढावा घेण्यात आला. त्यानंतर सभेचे अध्यक्ष, महामंडळ अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांनी जेवणाच्या विश्रांतीनंतर अर्ध्या तासाने सभा घेण्यात येईल अशी घोषणा केली. याला काही सभासदांनी जोरदार हरकत घेतली आणि सभेत एकच गोंधळ सुरू झाला.

अध्यक्षांच्या या निर्णयाला सभासदांनी जोरदार अक्षेप घेतला. अद्याप केवळ एक वाजला असताना भोजनासाठी वेळ घालवण्यापेक्षा कामकाज पुढे सुरू ठेवावे, अशी घोषणाबाजी यावेळी करण्यात आली. संचालक सुशांत शेलार यांनी नियमावलीप्रमाणे कामकाज होईल, असे सांगत विश्रांतीचे समर्थन करीत राहिले. पण याकडे कोणीही लक्ष दिले नाही. सभागृहात गोंधळ झाला. यावेळी राजभोसले आणि सुशांत शेलार भोजनकक्षाकडे जात असताना त्यांना सभासदांनी घेराव घातला. त्यांना सभा सुरू ठेवण्याचा एकच आग्रह केला.

अखेर संचालक सतीश रणदिवे,अभिनेत्री वर्षा उसगावकर यांच्यात चर्चा झाली. राजेभोसले पुन्हा मंचावर आले. पोलिसांनी गोंधळ घालणाऱ्या सभासदांना खाली जाण्यास सांगितले. यानंतर सभा सुरू झाली मात्र तरीही कायदेशीर बाबींवरून वाद, घोषणाबाजी सुरूच राहिली.

यामुळे सुरू झाला वाद

यावर्षी सभेत झालेल्या वादाचे मुख्य कारण होते. एक न्यायलयीन निकाल आणि त्यावरून झालेली फलकबाजी हे होते. अभिनेत्री छाया सांगावकर यांनी जूलै २०१४ ला उपाध्यक्ष मिलिंद अष्टेकर यांच्या विरोधात विनयभंगाची तक्रार केली होती. याप्रकरणी अष्टेकर यांची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. निकाल लागल्यावर गेल्या आठवडात अष्टेकर यांनी या प्रकाराविरोधात अभिनेत्री सांगावकर, अर्जुन नलवडे व सुरेंद्र पन्हाळकर यांच्या विरोधात २५ लाख रुपयांचा अब्रुनुकसानीच्या दाव्यासोबत फौजदारी गुन्हा नोंद केल्याचे सांगितले होते. दुसरीकडे, मात्र विनयभंगाच्या गुन्ह्यातून निर्दोष मुक्तता झाल्यानंतर अष्टेकरांच्या अभिनंदनाचा तर त्यांच्यावर गुन्हा दाखल केल्याप्रकरणी त्या तिघांच्या निषेधाचा फलक येथील महामंडळाच्या कार्यालयासमोर काहींनी लावला होता. या नोटीस प्रकरणाचा जाब आणि त्यावरून महामंडळाने केलेली कारवाई यावरून आज सभेत वाद पेटला.

First Published on: December 15, 2019 3:52 PM
Exit mobile version