‘स्त्री’चा पहिला लुक

‘स्त्री’चा पहिला लुक

श्रद्धा कपूर आणि राजकुमार राव

श्रद्धा कपूर आणि राजकुमार रावच्या ‘स्त्री’ चा पहिला लुक समोर आला आहे. चित्रपटाच्या पहिल्या लुकमध्ये श्रद्धा कपूर ननच्या कपड्यांमध्ये दिसत आहे. तिचा हा लुक पाहून हा चित्रपट हॉलीवूड ‘कंज्युरिंग’वरून तर प्रेरित नाही ना? अशी शंका येते. वास्तविक ‘कंज्युरिंग’ सिरीजचा पुढील चित्रपट ‘द नन’देखील लवकरच प्रदर्शित होत आहे. त्यामुळं या दोन्ही लुकमध्ये प्रेक्षकांकडून तुलना करण्यात येत आहे.

हा आहे हॉरर – कॉमेडी ड्रामा

श्रद्धा आणि राजकुमार रावचा हा चित्रपट फक्त हॉरर शैलीतला नाही, तर हॉरर – कॉमेडी या प्रकारात मोडणारा चित्रपट आहे. या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला आहे. या टीझरमध्ये ‘आता पुरुषांनाही वेदना होणार, स्त्री येत आहे.’ त्यामुळं या चित्रपटामध्ये राजकुमार राव पीडित आणि श्रद्धा कपूर भूत असल्याची शक्यता वाटत आहे. हा चित्रपट अमर कौशिक यांनी दिग्दर्शित केला असून ३१ ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे. श्रद्धा कपूर आणि राजकुमार राव ही जोडी पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर एकत्र येत आहे. ‘पहिल्यांदाच हॉरर – कॉमेडी करत असून खूप मजेदार चित्रपट आहे. तर राजकुमार रावदेखील खूपच चांगला अभिनेता आहे. त्याच्याबरोबर काम करण्याचं माझं स्वप्नं पूर्ण झालं. त्याच्याकडून मला खूप काही शिकायला मिळालं’ असं मत श्रद्धानं मांडलं.

श्रद्धा आणि राजकुमार सध्या व्यस्त

‘स्त्री’ व्यतिरिक्त श्रद्धा सध्या सायना नेहवालच्या बायोपिकमध्ये काम करत आहे. तर, शाहिद कपूरबरोबर ‘बत्ती गुल मीटर चालू’च्या चित्रीकरणातही ती सध्या व्यस्त आहे. याशिवाय ‘बाहुबली’ स्टार प्रभासबरोबर ‘साहो’ चित्रपटातही श्रद्धा दिसणार आहे. तर राजकुमार राव ‘फन्ने खाँ’, ‘मेंटल है क्या’ आणि ‘एक लडकी को देखा तो ऐसा लगा’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

First Published on: July 22, 2018 4:41 PM
Exit mobile version