अग्निपथ योजनेत केंद्र सरकारची पाठराखण करत कंगनाने शेअर केली पोस्ट

अग्निपथ योजनेत केंद्र सरकारची पाठराखण करत कंगनाने शेअर केली पोस्ट

मागील काही दिवसांपासून केंद्र सरकारच्या अग्निपथ योजनेला भारतातील अनेक राज्यांमधून विरोध केला जात आहे. या योजनेला विरोध करण्यासाठी संपूर्ण देशभर आंदोलं आणि जाळपोळ करण्यात येत आहे. दरम्यान आता यासगळ्यात बॉलिवूडच्या धाकड गर्लने केंद्र सरकारची बाजू घेतली आहे.

कंगनाने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये तिने अग्निपथ योजने अंतर्गत सैन्य भर्तीच्या सरकारच्या निर्णयाचे कौतुक करत सरकारची पाठराखण केली आहे. त्या पोस्टमध्ये कंगनाने लिहिलंयकी,”इस्त्राइलसारख्या देशामध्ये आपल्या भारतीय तरूणांना लष्कराचं प्रशिक्षण घेणं गरजेचं आहे. आपल्याकडे काही वर्ष तरूणांना लष्कराचे शिक्षण दिले जाते. त्यामुळे शिस्त, राष्ट्रवाद आणि देशाच्या सीमेचे संरक्षण करण्याचे महत्त्व कळते. या अग्निपथ योजनेचा उद्देश फक्त करिअर करणे आणि पैसे कमावणे इतकाच नाही”. असे कंगना म्हणाली.

तसेच ती पुढे म्हणाली, “पूर्वींची मुलं गुरूकुलमध्ये जाऊन राहायचे हे देखील तसंच आहे. शिवाय याचे पैसे सुद्धा मिळणार आहेत. आजकालची पिढी ड्रग्स आणि पबजीमुळे बिघडत आहे त्यामुळे ही योजना गरजेची आहे. या योजनेसाठी सरकारचे कौतुक करायला हवे”.

कंगनाचा ‘धाकड’ झाला फ्लॉप
नुकताच कंगनाचा ‘धाकड’ चित्रपट प्रदर्शित झाला. मात्र या चित्रपटाला प्रेक्षकांना फारसा प्रतिसाद मिळाला नाही. हा चित्रपट बॉक्स ऑफिस फ्लॉप ठरला. आता येत्या काळात कंगना ‘तेजस’ या चित्रपटामध्ये दिसणार आहे.

First Published on: June 19, 2022 1:39 PM
Exit mobile version