रिलीज आधीच ’83’ सिनेमा वादात! दीपिका पादुकोनसह निर्मात्यांविरोधात फसवणूकीची तक्रार

रिलीज आधीच ’83’ सिनेमा वादात! दीपिका पादुकोनसह निर्मात्यांविरोधात फसवणूकीची तक्रार

रिलीज आधीच '83' सिनेमा वादात! दीपिका पादुकोनसह निर्मात्यांविरोधात फसवणूकीची तक्रार

क्रिकेटर कपिल देव यांच्या जिवनावर आधारित आणि १९८३च्या भारताच्या पहिल्या वर्ल्ड कपची कहाणी सांगणाऱ्या 83 या सिनेमाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. मात्र सिनेमा रिलीज होण्याआधीच वादाच्या भोवऱ्यात आला आहे. अभिनेत्री दीपिका पादुकोनसह सिनेमाच्या निर्मात्यांविरोधात फसवणूकीची तक्रार दाखल करण्यात आली आहे. सिनेमावर UAE स्थित फायनान्सरने सिनेमाच्या निर्मात्यांनी कट रचून फसवणूक केल्याचा आरोप केला आहे. या संदर्भात मुंबईतील न्यायदंडाधिकारी कोर्टात भारतीय दंडसंहितेच्या कलम ४०५, ४०६, ४१५, ४१८,४२० आणि १२० ब अंतर्गत तक्रार दाखल करण्यात आली आहे.

दीपिका पादुकोन,साजिद नाडीयावाला आणि कबीर खान या तिघांनी 83 या सिनेमाची निर्मिती केली आहे. त्यामुळे या तिघांविरोधात ही तक्रार दाखल करण्यात आली आहे.दीपिका पादुकोनची निर्मिती म्हणून हा पहिला सिनेमा आहे. मात्र सिनेमा रिलीजच्या आधीच वादात सापडला आहे.

निर्मात्याविरोधात दाखल करण्यात आलेल्या तक्रारीत असे म्हटले आहे की, विब्री मीडिया सोबत सिनेमाच्या इव्हेस्टमेंटविषयी हैद्राबादमध्ये चर्चा होती. युएईमधील एका कंपनीने विब्री मीडियासोबत तब्बल १६ कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती. या गुंतवणूकीच्या मोबदल्यात चांगले रिटर्न्स दिले जातील असे सांगण्यात आले होते. यातील संपूर्ण पैसा हा 83 सिनेमासाठी खर्च करण्यात आला असे तक्रारीत म्हटले असल्याची माहिती वकील रिजवान सिद्धीकी यांनी दिली आहे.

वकील रिजवान सिद्धीकी यांनी पुढे म्हटले, माझ्या अशीलाकडे तक्रार दाखल करण्यापलिकडे कोणताच पर्याय नव्हता. त्यांनी अनेकदा हा प्रश्न आपापसात सोडवण्याचा प्रयत्न केला मात्र कोणत्याच निर्मात्यानी या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहण्याची तस्दी घेतली नाही. सिनेमाच्या निर्मात्यांवर करण्यात आलेल्या आरोपांचा सिनेमावर परिणाम होणार का हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे.


हेही वाचा – Video: ’83’ क्रिकेटप्रेमींसाठी पर्वणी

First Published on: December 10, 2021 7:18 PM
Exit mobile version