‘ईयर इन सर्च 2022’ मध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंपासून, सुष्मिता सेनपर्यंत ‘या’ व्यक्तींचा समावेश

‘ईयर इन सर्च 2022’ मध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंपासून, सुष्मिता सेनपर्यंत ‘या’ व्यक्तींचा समावेश

2022 मधील डिसेंबर महिना सुरु झाला आहे. येत्या काही दिवसात नव्या वर्षाची सुरुवात होईल. अशातच आता या वर्षी गूगलवर सर्वाधिक सर्च केलेल्या प्रसिद्ध व्यक्तींच्या नावाची लिस्ट समोर आली आहे. या लिस्टमध्ये महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांपासून अभिनेत्री सुष्मिता सेन, ललित मोदी यांचा देखील समावेश आहे. 2022 मध्ये सर्वात चर्चेत आलेले व्यक्तींचा या यादीत समावेश असल्याचे दिसून येत आहे.

बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेन आणि ललित मोदी मागील काही महिन्यांपूर्वी त्यांच्या नात्यामुळे प्रचंड चर्चेत होते. त्यांच्या नात्याला अनेकांनी ट्रोल देखील केलं होतं. त्यामुळे 2022 च्या गूगल सर्च इंजिन यादी ललित मोदी चौथ्या क्रमांकावर असून सुष्मिता सेन पाचव्या क्रमांकावर आहे. आश्चर्याची गोष्ट अशी की या यादीमध्ये सुष्मिता एकमेव अभिनेत्री आहे.

‘ईयर इन सर्च 2022’ मध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा देखील समावेश
‘ईयर इन सर्च 2022’ चा जो डाटा जारी करण्यात आला आहे. तो गेल्या 11 महिन्यांचा असून या काळात भारतामध्ये सर्वाधिक सर्च करण्यात आलेल्या प्रसिद्ध व्यक्तींचा समावेश आहे. या यादीत पहिल्या क्रमांकावर रायकीय नेत्या नुपूर शर्मा असून या मागील काही महिन्यांपासून मुहम्मद पैगंबरांबद्दल केलेल्या एका वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत आहेत. दुसऱ्या क्रमांकावर देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या आहेत.

तर तिसऱ्या क्रमांकावर ऋषी सुनक आहेत. त्यानंतर ललित मोदी चौथ्या क्रमांकावर असून सुष्मिता सेन पाचव्या क्रमांकावर आहे. सहाव्या क्रमांकावर सोशल मीडियावरील रिल्स बनवणारी अंजली अरोरा आहे. सातव्या क्रमांकावर ‘बिग बॉस 16’चा स्पर्धक अब्दु रोजिक आहे.आठव्या क्रमांकावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत. तर प्रवीण तांबा नवव्या स्थानी आहे. अंबर कळप दहाव्या क्रमांकावर आहे.

 


हेही वाचा :

‘बडे मियाँ छोटे मियाँ’मध्ये पृथ्वीराज सुकुमारन साकारणार खलनायकाची भूमिका

First Published on: December 8, 2022 9:22 AM
Exit mobile version