आलियाच्या ‘Gangubai Kathiawadi’चा बॉक्स ऑफिसवर कल्ला; 100 कोटींचा टप्पा केला पार

आलियाच्या ‘Gangubai Kathiawadi’चा बॉक्स ऑफिसवर कल्ला; 100 कोटींचा टप्पा केला पार

आलिया भट्ट्च्या ‘गंगूबाई काठियावाडी’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तुफान कल्ला केला आहे. 25 फेब्रुवारी रोजी हा चित्रपट रिलीज झाला, त्यादिवसापासून चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक चित्रपटगृहात गर्दी करत आहेत. कोरोना महामारीच्या मोठ्या ब्रेकनंतरही  चित्रपटगृहात कोटींची कमाई करणारा हा तिसरा चित्रपट आहे. संजय लीला भन्साळींच्या दिग्दर्शनात बनलेल्या गंगूबाई काठियावाडीला प्रेक्षकांचंही भरभरुन प्रेम मिळत आहे. आता या चित्रपटाने 100  करोडचा टप्पा पार केला असून या चित्रपटाला जगभरातून चांगला प्रतिसाद मिळतोय. आलिया भट्टने तिच्या दमदार अभिनयातून पुन्हा एकदा प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत.

गंगूबाई काठियावाडीने कमवलेल्या 100 कोटीची बातमी संजय लीला भंसाळींच्या प्रोडक्शन हाउसने दिली आहे. त्यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर ही बातमी शेअर लिहिले की, गंगूबाई काठियावाडीने जगभरातून 108.3 कोटींची कमाई केली आहे. तसेच त्यांनी पोस्टद्वारे सर्व प्रेक्षकांचे आभार व्यक्त केले आहेत.

आलियाच्या या चित्रपटाने पहिल्या दिवशीचं जबरदस्त सुरुवात केली होती. गंगूबाई काठियावाडीने पहिल्या दिवशी 10.5 करोडची कमाई केली होती. त्यामुळे आलियाचा हा चित्रपट अनेक बड्या चित्रपटांना सुद्धा टक्कर देतोय.

गंगूबाई काठियावाडी चित्रपटाचं कथानक पाहिलं तर, हा चित्रपट हुसैन जैदी लिखित ‘माफिया क्वीन ऑफ मुंबई’ या पुस्तकावर आधारित आहे. हा चित्रपट गंगूबाईच्या आयुष्यावर आधारित आहे, जिला तिच्या नवऱ्याने 500 रूपयांसाठी कामाठीपुऱ्यात विकलं होतं. जिथून तिच्या आयुष्यातील संघर्षाला सुरूवात झाली. त्यानंतर तिने महिलांच्या आणि लहान मुलांच्या हक्कासाठी लढायला सुरूवात केली.

गंगूबाई काठियावाडी चित्रपटामध्ये आलियासोबत अजय देवगन, विजय राज, शंतनु माहेश्वरी आणि सीमा पाहवा सुद्धा झळकणार आहेत. चित्रपटातील प्रत्येक पात्राचं कौतुक केलं जात आहे. आलियाने तिच्या आभिनयाने चित्रपटाला चार चाँद लावलेले आहेत.


 

First Published on: March 5, 2022 3:23 PM
Exit mobile version