गायत्री – लॉकडाऊन आणि सोशल वर्क!

गायत्री – लॉकडाऊन आणि सोशल वर्क!

कोविड-१९च्या महामारीने संपूर्ण जगावर संकटाचे सावट पसरले आहे. कोरोनाशी लढा देण्यासाठी सगळेच लॉकडाऊनच्या नियमांच पालन करत आहेत. सेलिब्रिटी मंडळी सुद्धा याला अपवाद नाहीत. पण या लॉकडाऊनच्या काळात अभिनेत्री गायत्री दातार मात्र सोशल वर्किंगमध्ये रमली आहे. एका सामाजिक संस्थेच्या मदतीने ती गोरगरिबांची आणि गरजूंची सेवा करत आहे. पुणे महापालिकेच्या सहकार्याने ही सामाजिक संस्था बेघर आणि गरजू व्यक्तींना अन्न पुरवण्याचे काम करते.

“लॉकडाऊनच्या काळात अनेकांना मदतीची गरज आहे. ‘झी युवा’वरील ‘युवा डान्सिंग क्वीन’चे शूटिंग सध्या बंद असल्यामुळे, माझ्याकडे उपलब्ध असलेल्या वेळेचा योग्य वापर करायचा असं मी ठरवलं. एका सामाजिक संस्थेला मदतकार्यासाठी मनुष्यबळाची गरज असल्याचं मला एका मित्राकडून कळलं. अशी संधी मिळत असल्यामुळे, त्यावर फार काळ विचार करण्यात अर्थ नव्हता. मी मदत करण्याचा निर्णय घेतला. अन्नाचं पॅकिंग आणि वाटप या दोन्ही गोष्टींसाठी मदत करायला मी सुरुवात केली. या कामांची लाज बाळगावी असं मला अजिबात वाटत नाही. बिकट स्थितीत या कामामुळे मला सकारात्मक ऊर्जा मिळते.”

मानसिक आरोग्य हीसुद्धा एक महत्त्वाची बाब आहे. लॉकडाऊनच्या काळात आपापले छंद जोपासून किंवा आवडते चित्रपट पाहून, संगीत ऐकून सर्वांनी नेहमी अनादी राहावं असा सल्ला गायत्रीने दिला आहे.


हे ही वाचा – कोरोना काही जाईना चला, त्याच्याबरोबरच जगायची आता तयारी करूयात!


 

First Published on: May 7, 2020 9:43 PM
Exit mobile version