कोरोना नियम उल्लंघनप्रकरणी गौहर खानची पहिली प्रतिक्रिया

कोरोना नियम उल्लंघनप्रकरणी गौहर खानची पहिली प्रतिक्रिया

कोरोना नियम उल्लंघनप्रकरणी गौहर खानची पहिली प्रतिक्रिया

बॉलिवूड अभिनेत्री गौहर खान कोरोना पॉझिटिव्ह असतानाही सार्वजिनक ठिकाणी फिरत असल्याने तिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातच तिने पॉझिटिव्ह असतानाही शुटिंगही चालू ठेवले. यामुळे गौहर खानवर इंडस्ट्रीमध्ये काम करण्यापासून दोन महिन्यांची बंदी घालण्यात आली आहे. फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉईजचा (FWICE) हा निर्णय घेतला आहे. नुकतेच गौहर खानच्या वडीलांचे निधन झाले. त्यामुळे आधीच वडील गेल्याच्या दु:खातून सावरत असताना तिच्यासमोर अडचणींचा डोंगर उभा राहत आहे. याबाबत गौहर खानने कोणतीही प्रतिक्रिया दिली नव्हती. परंतु गौहर खानच्या टीमकडून संबंधीत प्रकरणावर सविस्तर ट्वीट करण्यात आले. या ट्वीटमध्ये गौरह खान टीमच्या वतीने सांगण्यात आले आहे की, गौहर खानचा कोरोना रिपोर्ट कोरोना निगेटिव्ह आला आहे. त्यामुळे हे प्रकरण आणखी न वाढवता गौहरला काही काळ एकटीला सोडा, अशी विनंतीही करण्यात आली आहे.

यात गौहर खान टीमने आपल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे की, हा गौहरच्या कोरोना टेस्टनंतरचा निगेटिव्ह रिपोर्ट आहे. गौहर नियम, कायद्याचे पालन करणारी एक जबाबदार नागरिक आहे. त्यामुळे या प्रकरणावरुन वेगवेगळे अंदाज बांधणाऱ्यांना विनंती आहे की, हे प्रकरण आणखी वाढू नका. गौहर खान मुंबई महानगरपालिकेला अपेक्षित सर्व सहकार्य करणार असा विश्वासही टीमने व्यक्त केला आहे. यासोबत टीमने या पोस्टसोबत गौहर खानचा कोरोना निगेटिव्ह रिपोर्टही जोडला आहे. तसेच गौहर खानने पुढे मीडियाला विनंती करत म्हटले की, या मुदद्यांवर भाष्य करणे आता थांबवा. कारण काही दिवसांपूर्वी गौहरने आपल्या वडीलांना गमावले, त्यामुळे ती दु:खातून सावरण्याचा प्रयत्न करत आहे. तसेच पालिकेने दिलेल्या सुचनांचे पालन करत आहे. अशा परिस्थिती यावर चर्चा करणे बरोबर नाही. त्यामुळे तिला या परिस्थितीतून सावरण्यासाठी आणि तिच्या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी वेळ द्या. असा आशयाची पोस्ट गौहर खान टीमने शेअर केली आहे.


 

First Published on: March 16, 2021 4:42 PM
Exit mobile version