Doobey Song Release: गहराइयाचं पहिलं गाणे रिलीज, सिद्धार्थ दीपिकाची रोमँटीक केमिस्ट्री

Doobey Song Release: गहराइयाचं पहिलं गाणे रिलीज, सिद्धार्थ दीपिकाची रोमँटीक केमिस्ट्री

Boobey Song Release: गहराइयाचं पहिलं गाणे रिलीज, सिद्धार्थ दीपिकाची रोमँटीक केमिस्ट्री

अमेझॉन ओरिजिनल मूवी ‘गहराइयां’चा साउंडट्रॅक हा या वर्षातील सर्वात प्रतिक्षित अल्बम पैकी एक आहे. टीझरमध्ये असलेला चित्रपटाचा टायटल ट्रॅक आधीच सोशल मीडियावर ट्रेंड करत असून ट्रेलरमध्ये आलेल्या ‘डूबे’ने प्रेक्षकांच्या अपेक्षा आणखीनच वाढवल्या आहेत मात्र आता, प्रतीक्षा संपली असून चित्रपटाच्या साउंडट्रॅकमधून ‘डूबे’ हे पहिले गाणे प्रदर्शित झाले आहे. अंकुर तिवारी यांच्या द्वारे डिजाइन करण्यात आलेले हे आकर्षक गीत कबीर कथपालिया उर्फ ​​ओएएफएफ आणि सवेरा यांनी रचले आहे. या गाण्याला कौसर मुनीर यांनी लिहिले असून लोथिका झा यांनी गायले आहे.

या पहिल्या गाण्याबद्दल बोलताना, अंकुर तिवारी म्हणाले, “’गहराइयां’चे संगीत त्याच्या कथेसाठी योग्य असावे असे मला सुरुवातीपासूनच वाटत होते जे प्रेक्षकांना या पात्रांच्या जगात घेऊन जाण्यास मदत करेल. कबीर, सवेरा आणि आमचे गीतकार कौसर, या सर्वांनी तरुणपणाचे सार जमवून आणण्याचे अभूतपूर्व काम केले आहे तसेच लोथिकाचा आवाज या गाण्यामध्ये योग्य प्रमाणात ताजेपणा आणि तीव्रता जोडतो.”

दीपिका पदुकोणसोबत या चित्रपटात सिद्धांत चतुर्वेदी, अनन्या पांडे प्रमुख भूमिकेत आहेत. तसेच धैर्य कारवा, नसीरुद्दीन शहा आणि रजत कपूर महत्त्वपूर्ण भूमिकांमध्ये आहेत. धर्मा प्रोडक्शन्स, व्हायकॉम 18 आणि शकुन बत्राची जोउस्का फिल्म्स यांची सहनिर्मिती असलेला हा चित्रपट फक्त अमेझॉन प्राइम व्हिडियोवर 11 फेब्रुवारी 2022 रोजी जगभरातील 240 हून अधिक देश आणि प्रदेशांमध्ये प्रदर्शित होणार आहे.


हेही वाचा –  पतीच्या मृत्यूनंतर आजही Amir Khanची वाट पाहतेय कमला बाई, काय आहे प्रकरण?

First Published on: January 24, 2022 12:56 PM
Exit mobile version