गिरगाव ते गावचे नाटक

गिरगाव ते गावचे नाटक

विजय पवार

परळमधील ज्या सांस्कृतिक कार्य करणार्‍या संस्था आहेत त्यात सहकारी मनोरंजन मंडळ ही एक आहे. आणखीन काही वर्षांनंतर ही संस्था शताब्दी महोत्सवी वर्ष साजरे करणार आहे. त्याची पूर्वतयारी म्हणून मंडळाचे पदाधिकारी प्रमोद तांबे, रूपेश कदम, राहुल पवार यांनी के राघवकुमार यांच्या संकल्पनेत गप्पा दिलखुलास हा कार्यक्रम प्रत्येक महिन्यात सुरू केलेला आहे. प्रसिद्धीपासून अलिप्त असलेले परंतु नाटकावर प्रचंड श्रद्धा असलेले विजय पवार यांना 28 एप्रिलच्या गप्पांच्या कार्यक्रमात निमंत्रित करण्यात आलेले आहे.

कामगार मुलांना संघटीत करणे, त्यांच्या गुणांना हेरून त्यांना नाट्य चळवळीत सामावून घेणे या पवारांच्या कार्याचे मुंबईबरोबर कोकणातल्या नाट्य चळवळीनेही कौतुक केलेले आहे. गिरणगाव ते गावचे नाटक असा त्यांचा प्रदीर्घ प्रवास उलगडून सांगितला जाणार आहे.

सायंकाळी 6 वाजता दामोदर हॉलच्या पहिल्या माळ्यावर हा कार्यक्रम होणार आहे जो प्रेक्षकांसाठी विनामूल्य आहे. यापूर्वी मोहन साटम, किशोर बेळेकर यांना मासिक गप्पा कार्यक्रमात निमंत्रित केले होते.

First Published on: April 27, 2019 4:53 AM
Exit mobile version