‘गोल्ड’ आणि ‘सत्यमेव जयते’ ची होणार टक्कर

‘गोल्ड’ आणि ‘सत्यमेव जयते’ ची होणार टक्कर

पोस्टर

या वर्षी १५ ऑगस्टला बॉक्स ऑफिसवर दोन चित्रपटांची चांगलीच टक्कर होणार आहे. या दिवशी तीन चित्रपट एकत्र प्रदर्शित होणार होते. मात्र त्यापैकी एका चित्रपटानं आपली प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलली आहे. अक्षय कुमारचा ‘गोल्ड’, जॉन अब्राहमचा ‘सत्यमेव जयते’ आणि धर्मेंद्र, सनी आणि बॉबीचा ‘यमला पगला दीवाना ३’ हे एकाच दिवशी प्रदर्शित होणार होते. हे तीनही चित्रपट एकाच दिवशी प्रदर्शित झाले असते तर तिघांनाही नुकसान सहन करावं लागलं असतं.

‘यमला पगला दीवाना ३’ प्रदर्शनाची तारीख पुढे

१५ ऑगस्ट या सुट्टीच्या विशेष दिवसाचा फायदा या तिनही चित्रपटांना उचलायचा होता. मात्र तिन्ही चित्रपट एकाच वेळी प्रदर्शित झाल्यास, तिन्ही चित्रपटांचं नुकसान झालं असतं. त्यामुळं ‘यमला पगला दीवाना ३’ नं आपल्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलली आहे. अक्षय कुमारच्या देशभक्ती आणि स्पोर्ट्सचं कथानक असलेला ‘गोल्ड’ आणि भ्रष्टाचाराशी लढा देणारा ‘सत्यमेव जयते’ या चित्रपटांमध्ये आता टक्कर होणार असून देओल परिवारानं आपल्या ‘यमला पगला दीवाना ३’ नं आपल्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. आता हा चित्रपट १५ ऑगस्टऐवजी ३१ ऑगस्टला प्रदर्शित करण्यात येईल. याबाबत ट्रेड अॅनालिस्ट तरण आदर्श यानं ट्विट करून माहिती दिली आहे.

टक्कर होणाऱ्या चित्रपटात काय?

बॉक्स ऑफिसवर १५ ऑगस्टला येणारे दोन्ही चित्रपट हे देशभक्तीच्या भावनेनं भारलेले आहेत. अक्षय कुमारचा ‘गोल्ड’ हा हॉकीवर आधारित असून यामध्ये अक्षय एका हॉकी कोचच्या भूमिकेत दिसणार असून मौनी रॉय ही छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर येणार आहे. तर जॉन अब्राहमच्या ‘सत्यमेव जयते’ मध्ये मनोज वायपेयीदेखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर हा चित्रपट भाष्य करत आहे. दोन्ही चित्रपटांचे ट्रेलर प्रदर्शित झाले असून आता दोन्हीपैकी कोणता चित्रपट कमाल दाखवणार हे लवकरच कळेल.

First Published on: July 3, 2018 2:17 PM
Exit mobile version