‘गोल्ड’ने मारली पहिल्याच दिवशी बाजी

‘गोल्ड’ने मारली पहिल्याच दिवशी बाजी

गोल्ड आणि सत्यमेव जयते

अक्षयकुमारचा ‘गोल्ड’ ७२ व्या स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी प्रदर्शित करण्यात आला. बॉलीवूडचा ‘खिलाडी’ अक्षयकुमारचा पिरियड ड्रामा ‘गोल्ड’ आणि जॉन अब्राहमचा ‘सत्यमेव जयते’ हे दोन्ही चित्रपट प्रदर्शित झाले असले तरीही पहिल्या दिवशी ‘गोल्ड’नं बाजी मारल्याचं समोर आलं आहे. दोन्ही चित्रपटांनी जरी प्रेक्षकांना चित्रपटगृहात खेचलं असलं तरीही ट्रेड अॅनालिस्ट तरण आदर्श आणि रमेश बाला या दोघांनीही पहिल्या दिवशीच्या कलेक्शनबद्दल ट्विटरवर माहिती दिली आहे.

‘गोल्ड’नं जिंकलं प्रेक्षकांचं मन

अक्षयकुमारच्या ‘गोल्ड’नं पहिल्याच दिवशी २७ कोटींची कमाई करत ओपनिंग रेकॉर्ड तोडला आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वीच अॅनालिस्टनं या चित्रपटासाठी पहिल्या दिवशीची कमाई १८ कोटी असण्याची शक्यता वर्तवली होती. मात्र यापेक्षा साधारण ९ कोटीच्या आसपास जास्त कमाई या चित्रपटानं केली आहे. १९४८ मध्ये भारतानं स्वातंत्र्यानंतर पहिलं सुवर्णपदक इंग्लंडमध्ये जाऊन जिंकलं. इंग्रजांना त्यांच्याच देशात जाऊन भारतानं हे सुवर्णपदक मिळवलं होतं. अक्षयकुमार आणि टीमनं हीच आठवण जागवण्याचा प्रयत्न या चित्रपटातून केला आहे. दरम्यान दुसऱ्या बाजूला ‘सत्यमेव जयते’ या जॉन अब्राहमच्या चित्रपटाला सुरुवातीला चांगलं ओपनिंग मिळणार नाही असा अंदाज ट्रेड अॅनालिस्टनं लावला होता. त्याप्रमाणं हा अंदाज सिद्ध झाला आहे. मात्र दोन्ही अभिनेत्यांनी आपल्या पूर्वीच्या चित्रपटांच्या पहिल्या दिवशीचा कमाईचा रेकॉर्ड या दोन्ही चित्रपटांद्वारे मोडला आहे. हे दोन्ही चित्रपट साधारण २५०० स्क्रिन्सवर प्रदर्शित करण्यात आले आहेत. अजून पूर्ण विकेंड बाकी असल्यामुळं आता हा कमाईचा आकडा कुठपर्यंत पोहचतो आणि इतर कोणत्या चित्रपटांचे कमाईचे रेकॉर्डब्रेक करतो हे पाहणं मनोरंजक ठरेल.

First Published on: August 16, 2018 1:41 PM
Exit mobile version