खुशखबर! आता NETFLIX वर दर आठवड्याला पहा नवीन सिनेमे

खुशखबर! आता NETFLIX वर दर आठवड्याला पहा नवीन सिनेमे

खुशखबर! आता NETFLIX वर दर आठवड्याला पहा नवीन सिनेमे

कोरोनाच्या काळात चित्रपटगृहे बंद झाली. चित्रपटगृहे बंद झाल्याने प्रेक्षक प्रामुख्याने ओटीटी प्लॅटफॉर्मकडे वळला. लॉकडाऊनच्या काळात लोकांनी प्रामुख्याने ओटीटी प्लॅटफॉर्मवर सर्वात जास्त वेळ घालवला. यातील सर्वात लोकप्रिय प्लॅटफॉर्म म्हणजे नेटफ्लिक्स. लॉकडाऊनच्या काळात अनेक सिनेमे आणि वेबसिरिज नेटफ्लिक्सवर प्रदर्शित करण्यात आल्या. लॉकडाऊनच्या काळात नेटफिक्स वापरणाऱ्या युझर्सची संख्याही वाढली. नेटफ्लिक्सचे सबस्कायबर्सही वाढले आहेत. नेटफ्लिक्स नेहमीच सबस्क्रायबर्सना नवीन नवीन भन्नाट ऑफर देत असते. आता अशीच धमाकेदार घोषणा नेटफ्लिक्सने केली आहे. नेटप्लिक्सवर आता दर आठवड्याला नवीन सिनेमा पहायला मिळणार आहे.


वर्षांच्या सुरूवातीलाच नेटफ्लिक्सने ही धमाकेदार घोषणा केल्याने ओटीटी प्लॅटफॉर्मवर नेटफ्लिक्सचे रेटिंग आणखी वाढण्याची शक्यता आहे. नेटफ्लिक्सचे जगभरात जवळपास २०० कोटी सबस्क्रयबर्स आहेत. २०२१ मध्ये नेटफ्लिक्सवर दर आठवड्याला नवीन सिनेमे रिलिज करण्याचे आश्वासन दिले आहे. या वर्षात ७० नवे सिनेमे नेटफ्लिक्सवर रिलिज करणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे २०२१मध्ये नेटफ्लिक्स युझर्सना एकाहून एक सरस सिनेमांची मेजवानी प्रेक्षकांना मिळणार आहे.

सध्या नेटफ्लिक्सवर रेड नोटिस, आर्मी ऑफ द डेड, डोन्ड लुक अप, द गर्ल ऑन द ट्रेन यासांरख्या सिनेमांचे ट्रेलर लाँच करण्यात आले आहेत. नेटफ्लिक्सने दिलेल्या माहितीनुसार, येत्या वर्षभरात प्रदर्शित होणाऱ्या सिनेमांमध्ये ७० सिनेमांच्या समावेश असणार आहे. यात ५२ इंग्रजी सिनेमे, ८ एनिमेटड आणि १० नॉन इंग्लिश सिनेमे असणार आहेत. नेटफ्लिक्स संपूर्ण जगभरात पाहिला जाणारा सर्वात लोकप्रिय ओटीटी प्लॅटफॉर्म आहे.


हेही वाचा – बिग बी ट्रोल, नेटकऱ्यांनी वंशवादावरून सुनावले

 

First Published on: January 14, 2021 1:44 PM
Exit mobile version