Prajaktta Mali Post : ‘लहान तोंडी मोठा घास, पण.. ; प्राजक्ता माळीची राज्य सरकारला कळकळीची विनंती

Prajaktta Mali Post : ‘लहान तोंडी मोठा घास, पण.. ; प्राजक्ता माळीची राज्य सरकारला कळकळीची विनंती

Prajaktta Mali Post : 'लहान तोंडी मोठा घास, पण.. ; प्राजक्ता माळीची राज्य सरकारला कळकळीची विनंती

मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळी हिने तिच्या सहजसुंदर अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केलं आहे. दरम्यान प्राजक्ता ही महाराष्ट्राची लाकडी अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. अभिनयासोबतच प्राजक्ता उत्कृष्ट नृत्यांगणा आणि सूत्रसंचालन यासह लेखिकासुद्धा आहे. आपल्या विविध कालागुणांचे सादरीकरण ती सोशल मीडियाच्या माध्यमातून नेहमीच करत असते. अनेक फोटो आणि व्हिडिओ शेअर करत चाहत्यांशी कनेक्ट राहण्याचा प्रयत्न करते. यादरम्यानच प्राजक्ताने एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. प्राजक्ताचा पावनखिंड हा सिनेमा रिलीजच्या वाटेवर असून,सरकारने चित्रपटगृह 100 टक्के आसनक्षमतेने सुरु करावी, अशी राज्य सरकारने कळकळीची विनंती केली आहे. ‘लहान तोंडी मोठा घास,पण आता बोलायला हवे’,  अशा आशयाचे कॅप्शन प्राजाक्ताने तिच्या इंस्टाग्राम अकांऊटवर व्हिडिओ शेअर करत लिहिले आहे.

काय आहे प्राजक्ताची विनंती ?

प्राजक्ताने एक व्हिडीओ शेअर केला आहे. “नमस्कार, नुकतंच आमच्या पावनखिंड या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आणि त्याला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाला. सर्वच मराठी चित्रपटांना प्रेक्षकांचे भरभरुन प्रेम मिळत आहे, त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार. 18 फेब्रुवारीला पावनखिंड चित्रपट प्रदर्शित होत आहे. त्याही चित्रपटावर प्रेक्षक मनापासून प्रेम करतील. पण आता राज्य सरकारलाच विनंती आहे की, कोरोनाचा जोर ओसरला आहे. सर्वच नियम बऱ्यापैकी शिथिल करण्यात आले आहेत. फक्त चित्रपटगृह आणि नाट्यगृहच 50 टक्के आसनक्षमतेने सुरु आहेत, असे का?”

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आणि कोरोनाचा जोर ओसरत असल्याने, महाराष्ट्र सरकारने चित्रपटगृह 100 टक्के आसनक्षमतेने सुरु करा, अशी विनंती केली आहे. सर्व मराठी रसिक सुज्ञ आहेत, करोना नियमांचं पालन करून ते कलाकृतींचा आस्वाद घेतील अशी आम्हांला खात्री वाटते.तरी आमची विनंती विचारात घ्यावी, असे प्राजक्ता माळी म्हणाली आहे.

इतिहासातल्या अभूतपूर्व लढाईची झलक! ‘पावनखिंड’

फर्जंद आणि फत्तेशिकस्त या सिनेमाच्या अभूतपूर्व यशानंतर दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांचा पावनखिंड या सिनेमाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून सिनेमाची चर्चा आहे. अखेर सिनेमाचा दमदार ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अभूतपूर्व कारकिर्दीतील त्यांच्या पराक्रमाची गाथा सांगणाऱ्या शिवराज अष्टका’तील ‘पावनखिंड’ हे तिसरं पुष्प आहे. बाजीप्रभू देशपांडे आणि बांदल सेनेच्या रक्ताने इतिहासाच्या विजयी पराक्रमाचे पान पावनखिंड या सिनेमातून दाखवण्यात येणार आहे. कोरोना काळात लांबणीवर पडलेल्या सिनेमांपैकी पावनखिंड हा सिनेमा असून अखेर येत्या 18 फेब्रुवारीला सिनेमा प्रदर्शित होणार आहे.

 


हे ही वाचा – Goa Assembly Election 2022: गोव्यात 301 उमेदवारांचे भवितव्य 11 लाखांहून अधिक मतदारांच्या हाती, उद्या होणार मतदान


 

 

 

First Published on: February 13, 2022 2:18 PM
Exit mobile version