प्रियांका चोप्राचा अतरंगी गाऊन सोशल मीडियावर ट्रोल

प्रियांका चोप्राचा अतरंगी गाऊन सोशल मीडियावर ट्रोल

प्रियांका चोप्राचा अजब ड्रेस

प्रियांका चोप्रा आणि निक जोनास आपल्या फॅशन स्टाईलमुळे नेहमीच चर्चेत असतात. मात्र कधी कधी अतरंगी फॅशन केल्यामुळे दोघेही टीकेचे धनी झालेले आहेत. सध्या ग्रॅमी पुरस्कार सोहळ्यात बॉलिवूडच्या देसी गर्लने असा काही पेहराव केला होता की, तिच्यावर ट्रोलिंग केलं जातंय. ग्रॅमी पुरस्कार सोहळ्याला प्रियांकाने घातलेल्या गाऊनची चर्चा स्टार्समध्ये चांगलीच रंगली मात्र सामान्य चाहत्यांनी मात्र प्रियांकावर आपली नाराजी व्यक्त केली आहे.

प्रियांकाने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर तीन फोटो अपलोड केले आहेत. तीनही फोटोंना लाखो लाईक्स मिळाले आहेत. मात्र प्रियांकाच्या भारतीय चाहत्यांना प्रियांकाचा फॅशन सेन्स मात्र रुचलेला दिसत नाही. एका युजर्सने कमेंटमध्ये म्हटले आहे की, हॉलिवूडमध्ये गेल्यानंतर प्रियांका स्वतःचा फॅशन सेन्स गमावून बसली आहे. तर काही चाहत्यांनी अशा प्रकारचे ड्रेस घालू नयेत, असाही मोफतचा सल्ला देऊन टाकलाय.

ग्रॅमी पुरस्कार सोहळ्यासाठी प्रियांका आपला पती निक जोनास सोबत तयार झाल्याचे काही फोटो इन्स्टावर अपलोड करण्यात आलेले आहेत. या फोटोत प्रियांकाने ऑफ व्हाईट गाऊन घातला आहे. जो डीप फ्रंट ओपन गाऊन या प्रकारातला आहे. गळ्यापासून पोटापर्यंत हा गाऊन मोकळा असल्यामुळे भारतीय चाहत्यांना तो आवडलेला नाही. ग्रॅमी पुरस्कार सोहळ्यासाठी प्रियांकाने राल्फ अँड रुसो यांनी डिझाईन केलेला गाऊन घातलेला आहे. या सोहळ्यासाठी ती पती निक जोनाससोबत पोहोचली होती.

हे वाचा – गणेश आचार्य दाखवायचे पॉर्न व्हिडिओ; महिला कोरिओग्राफरचा आरोप

यापुर्वी देखील प्रियांका आपल्या आगळ्यावेगळ्या फॅशनमुळे ट्रोल झालेली आहे. मेट गाला २०१९ या स्टायलीश सोहळ्यात प्रियांका चोप्राने केलेला पेहरावाने जगभरातील ट्रोलर्सच्या कल्पकतेला बहर आणला होता. यावेळी प्रियांकाने केसांचा जो टोप केला होता, त्यावर बरेच मिम्स देखील त्यावेळी आले होते.

मेट गाला २०१९ मध्ये प्रियांकाने केलेली स्टाईल

 

First Published on: January 27, 2020 6:33 PM
Exit mobile version