Video – रितेश म्हणतो, Happy Anniversary Bayko!

Video – रितेश म्हणतो, Happy Anniversary Bayko!

रितेश देशमुख आणि जेनेलिया देशमुख हे बॉलिवूडमधले सगळ्यात क्यूट कपल आहेत. या क्यूट कपलच्या लग्नाला आज ८ वर्ष पुर्ण झाली आहेत. ३ फेब्रुवारी २०१२ साली रितेश आणि जेनेविया विवाहबंधनात अडकले. या निमीत्ताने रितेशने आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन जेनेलियाला अतरंगी शुभेच्छा दिल्या आहेत.

२००३ साली रितेशने ‘तुझे मेरी कसम’ या चित्रपटातून पदार्पण केलं. या सिनेमात जेनेलिया रितेशची हिरॉईन होती. या चित्रपटादरम्यान दोघांमध्ये झालेल्या मैत्रीचं रुपांतर नंतर प्रेमात झालं. पण सध्या हे दोघे बॉलिवूडमधील बेस्ट कपल आहेत.

या आधी देखील या दोघांनी सोशल मीडियावर शेअर केलेले व्हिडीओ चाहत्यांना आवडले होते. ‘तुझे मेरी कसम’ या चित्रपटाला १७ वर्षे पूर्ण झाल्यामुळे अभिनेता रितेश देशमुखने जेनेलियासोबत रोमँटिक डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा व्हिडिओ त्यांनी लातूर जिल्ह्यातील आपलं मूळ गाव असलेल्या बाभूळगावात शूट केला आहे.

First Published on: February 3, 2020 1:19 PM
Exit mobile version