Amol Palekar Birthday: ‘एँग्री यंग मॅन’च्या काळातील ‘कॉमन मॅन’

Amol Palekar Birthday: ‘एँग्री यंग मॅन’च्या काळातील ‘कॉमन मॅन’

Amol Palekar Birthday: 'एँग्री यंग मॅन'च्या काळातील 'कॉमन मॅन'

‘अमोल पालेकर’ एक उत्तम अभिनेता, दिग्दर्शक आणि निर्माता. अमोल पालेकरांनी प्रामुख्याने हिंदी आणि मराठी सिनेमात काम केले. एक चित्रकारापासून सुरू झालेला पालेकरांचा प्रवास एक एंग्री यंग मॅन पर्यंत येऊन पोहचला. ७०च्या दशकात अमिताभ बच्चन यांच्या काळात अमोल पालेकरांनी ‘एंग्री यंग मॅन’चा किताब मिळवला होता. परंतु या एंग्री मॅनच्या मागे होता तो  म्हणजे एक रियल कॉमन मॅन. अमोल पालेकरांचे नाव घेतल्यावर पहिल्यांदा आठवतो ते म्हणजेच त्यांचा गोलमाल हा सिनेमा. एका कॉमन मॅनची भूमिका त्यांनी इतक्या सहजपणे वठवली की त्यानंतर त्यांच्यासारखा अभिनय कोणालाही जमला नाही. अमोल पालेकरांचा जन्म २४ नोव्हेंबर १९४४ साली मुंबईत झाला.  आज ते त्यांचा ७७ वा वाढदिवस साजरा करत आहेत. त्यांच्या वाढदिवानिमित्त जाणून घेऊया त्यांचा ‘एँग्री यंग मॅन’च्या काळातील ‘कॉमन मॅन’ पर्यंतचा प्रवास.

अमोल पालेकरांचा अभिनय हा प्रत्येक सामान्य माणसांपर्यंत पोहोचायचा कारण त्यांच्या अभिनयात असलेली सहजता, त्यांची बोलण्याची पद्धत अगदी सामान्य लोकांसारखी असायची. सहज, साध्या अभिनयाने त्यांनी प्रेक्षकांची मने जिंकली. गोलमाल सिनेमात त्यांच्यावर चित्रीत करण्यात आलेल्या ‘एक दिन सपने मे देखा सपना… वो जो है न अमिताभ अपना…’ या गाण्यात अमोल यांचे स्वप्न होते की अमिताभ बच्चन बनाव. ते अमिताभ बच्चन नाही झाले मात्र त्यांच्या खांद्याला खांदा देऊन नक्कीच पुढे आले. कॉमन मॅनची भूमिका साकारण्यात अमोल पालेकरांचा हात कोणीही धरू शकले नाही. ‘गोलमाल’, ‘घरौंदा’, ‘चितचोर’,’छोटीसी बात’, ‘बातों बातों मे’,’आदमी और औरत’,’रंग बिरंगी’,’अपने पराये’ यासारख्या अनेक सिनेमात अमोल पालेकरांनी एका कॉमन मॅनच्या व्यक्तिरेखा साकारल्या होत्या आणि याच व्यक्तिरेखेतून त्यांनी प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं.

अमोल पालेकांनी अभिनयापेक्षा दिग्दर्शनात लोकप्रियता मिळवली. दिग्दर्शनात एक वेगळे नाव तयार केले. अमोल पालेकरांच्या उत्कृष्ट दिग्दर्शनासाठी त्यांना पाच वेळा राष्ट्रीय पुरस्कारांनी गौरवण्यात आले. ‘आंखे’ या सिनेमातून दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केले. त्याचप्रमाणे त्यांनी या सिनेमात अभिनय देखील केला होता. आंखे नंतर त्यांनी ‘दायरा’,’रुमानी हो जाए’,’बांगरवाडी’,’ध्याव परवा’,’पहेली क्वेस्ट’,’एंड वन्स अगेन’ यासारख्या सिनेमांचे दिग्दर्शन केले. ‘मी पहिल्यांदा एक चित्रकार आहे, अपघाताने मी अभिनेता झालो, मजबुरीने निर्माता बनलो आणि माझ्या मर्जीने दिग्दर्शक झालो’, असे अमोल पालेकर स्वत: बद्दल सांगतात.

पालेकरांनी आयुष्यात दोन वेळा लग्न केली. पहिली पत्नी चित्रा हिच्याशी घटस्फोट घेऊन वयाच्या ५७व्या वर्षी सध्या गोखले यांच्याशी दुसरे लग्न केले. त्यांना दोन मुली आहेत. त्यांची एक मुलगी लेस्बियन असून याची माहिती अमोल पालेकरांच्या पत्नीने दिली होती.


हेही वाचा – “का रं देवा’मध्ये झळकणार अभिनेत्री मोनालिसा बागल, चित्रपटाचं पोस्टर लाँच

First Published on: November 24, 2021 8:14 AM
Exit mobile version