Happy Birthday Madhuri Dixit: अभिनेत्रींमध्ये फक्त माधुरीच्या नावे ‘हा’ रेकॉर्ड

Happy Birthday Madhuri Dixit: अभिनेत्रींमध्ये फक्त माधुरीच्या नावे ‘हा’ रेकॉर्ड

बॉलिवूडची धक धक गर्ल अभिनेत्री माधुरी दीक्षित हिचा आज वाढदिवस. १५ मे १९६७ साली माधुरीचा जन्म मुंबईत झाला. आज माधुरी आपला ५२ वा वाढदिवस साजरा करत आहे. माधूरीच्या अभिनयाचा करिश्मा अजूनही तसाच असून आजही चित्रपटात काम करताना दिसत आहे. माधुरीला ही हिंदी चित्रपटातील अशी अभिनेत्री आहे, तिला तब्बल १४ वेळा फिल्म फेअर पुरस्काराचे नामांकन मिळाले त्यातून चार वेळ ती विजेती झाली. अनेक अभिनेत्रींमध्ये फक्त माधुरीच्या नावे हा रेकॉर्ड आहे. तिच्या या वाढदिवसाच्या दिवशी तिच्या आयुष्याशी निगडीत काही गोष्टी…

तेजाब चित्रपटानंतर कधीच मागे वळली नाही

माधुरी दीक्षितने चित्रपटाच्या कारकिर्दीच्या सुरूवातीच्या काळात यश मिळाले नाही. १९८८ मध्ये ‘दयावान’ या चित्रपटात तिच्यापेक्षा २१ वर्षानी मोठ्या असणाऱ्या अभिनेता विनोद खन्नासोबत केलेल्या किसिंग सीनमुळे ती चर्चेत आली होती. ‘एक दो तीन…’ मुळे प्रसिद्ध झालेला तेजाब या चित्रपटातून माधुरीच्या करिअरच्या यशाचा आलेख वाढत गेला.

रिलेशनशिप आणि लग्न

सुरूवातीच्या काळात माधुरीचे नाव अभिनेता अनिल कपूरपासून अभिनेता संजय दत्तपर्यंत जोडले गेले. अनिल सोबत राम लखनच्या दरम्यान संजयसोबत साजन चित्रपटाच्यावेळी माधुरीची जवळीक वाढली. मात्र त्याचे नाते फार काळ टिकले नाही. तेव्हा १९९९ मध्ये माधुरीचे लग्न डॉ. श्रीराम नेने यांच्या सोबत झाले.

डॉक्टर बनण्याचे स्वप्न

माधुरीचे वडील शंकर दीक्षित आणि आई स्नेह लता दीक्षितची मुलगी माधुरीला बालपणी डॉक्टर बनण्याची इच्छा होती. माधुरीने मुंबई यूनिवर्सिटीतून बीए केले होते. तीन वर्षाची असताना तिने नृत्य शिकण्यास सुरूवात केली. त्यानंतर तिने आपल्या बहिनींसोबत डान्स क्लास घेण्यास सुरूवात केली.

पहिला मराठी चित्रपट

माधुरी काही दिवसांपुर्वी आलेल्या बकेट लिस्ट या मराठी चित्रपटात दिसली होती. या चित्रपटात काम करण्यापुर्वी तिची सामान्य महिलेशी संबधित असणारी भूमिका साकारण्याची इच्छा होती. या चित्रपटात सुमित राघवन यांनी देखील माधुरी सोबत महत्त्वाची भूमिका साकारली होती. २५ वर्षांनंतर माधुरी संजय सोबत पुन्हा दिसली होती. करण जोहरच्या कलंकमध्ये माधुरी आणि संजय पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर दिसली होती.

First Published on: May 15, 2019 2:22 PM
Exit mobile version