हार्दिक पंड्या लग्नाच्या 3 वर्षांनंतर पुन्हा धूमधडाक्यात करणार लग्न

हार्दिक पंड्या लग्नाच्या 3 वर्षांनंतर पुन्हा धूमधडाक्यात करणार लग्न

भारतीय क्रिकेटर हार्दिक पंड्या पुन्हा एकदा विवाहबंधनात अडकणार आहे. हार्दिक त्याची पत्नी नताशा स्टेवोविकसोबत दुसऱ्यांदा पारंपारिक पद्धतीने लग्न करणार आहे. यापूर्वी त्यांनी 2020 मध्ये कोर्ट मॅरेज केले होते. त्यानंतर त्यांना एक मुलगा देखील झाला. दरम्यान, लग्नाच्या 3 वर्षानंतर हार्दिक-नताशा पुन्हा बोहोल्यावर चढणार आहेत.

14 फेब्रुवारीला होणार लग्न

मात्र, त्यांच्या मनात धूमधडाक्यात लग्न करण्याची इच्छा होती. त्यामुळे यावेळी ते लग्नात मेहंदी, हळद, ढोल धमाका आणि संगीत अशा पांरपारिक पद्धतीने लग्न करणार आहेत. दरम्यान, आता या बातमीमुळे त्यांचे चाहते खूप उत्सुक झाले असून लग्नाच्या फोटोंची वाट पाहत आहेत.


हेही वाचा :

कियारा-सिद्धार्थच्या रिसेप्शनमध्ये बॉलिवूड कलाकारांची हजेरी

First Published on: February 13, 2023 10:40 AM
Exit mobile version