HBD:काजोलने वयाच्या 16 व्या वर्षी सिनेसृष्टीत केलं होतं पदार्पण,आज आहे सुपरस्टार

HBD:काजोलने वयाच्या 16 व्या वर्षी सिनेसृष्टीत केलं होतं पदार्पण,आज आहे सुपरस्टार

HBD:काजोलने वयाच्या 16 व्या वर्षी सिनेसृष्टीत केलं होतं पदार्पण,आज आहे सुपरस्टार

बॉलिवूड अभिनेत्री काजोल गेल्या अनेक दशकापासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. आपल्या सहज सुंदर अभिनयाने तिने प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केलं. काजोलची गणना अनेक हिट अभिनेत्रींच्या यादीत करण्यात येते. काजोलने अनेक प्रसिद्ध अभिनेत्यासोबत कामं केलं आहेत. यापैकीच चाहत्यांच्या अगदी जवळची व हीट जोडी ठरली ती शाहरूख आणि काजोल यांची. या दोघांची केमिस्ट्री पडद्यावर दिसतात थेटरमध्ये लोकांची गर्दी वाढू लागते. दोघांनी अनेक चित्रपटात एकत्र काम केलं आहे. आज काजोलसाठी अत्यंत खास दिवस आहे. काजोल तिचा वाढदिवस साजरा करत आहे. या स्पेशल दिवसाच्या निमित्ताने काजोलच्या आयुष्यातील काही खास गोष्टी जाणून घेणार आहोत.

काजोल बॉलिवूडमधील दिग्गज निर्माता तसेच दिग्दर्शक शोमू मुखर्जी आणि अभिनेत्री तनुजा यांची मुलगी आहे. तसेच काजोलची लहान बहिण तनीषा सुद्धा अभिनय क्षेत्रात आहे. पण तनीषा आपल्या बहिण आणि आई प्रमाणे पडद्यावर काही खास चमक दाखवू शकली नाही. काजोल लहानपणा पासूनच खूप हट्टी आहे. आपल्याला जे हवं आहे ते मिळवण्यासाठी काजोल तिच्या आई-वडिलांना फार त्रास देत असे. या गोष्टीचा उलगडा स्वत: काजोलने एका मुलाखती दरम्यान केला होता.
काजोलने 1992 साली अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं होतं. तिचा पहिला वहिला सिनेमा ‘बेखुदी’ हा होता. यानंतर अनेक हिट सिनेमात काजोल झळकली. काजोल त्या काळात नंबर वन अभिनेत्रीपैकी एक होती. तिचे दिल वाले दुल्हनिया ले जायेंगे, कुछ कुछ होता हे,बाजीगर,करण अर्जुन,कभी खुशी कभी गम, हे सिनेमे खूप गाजले होते. काजोलला मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी मिळाली होती. शाहरुख खान, सलमान खान, अजय देवगण अशा स्टार्ससोबत काजोल अभिनय करताना दिसली होती.

बॉलिवूडसह काजोलने दाक्षिणात्य सिनेमात आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला. ‘Minsaara Kannavu’ तसेच प्रभुदेवा आणि अरविंद स्वामी यांच्या तमिळ सिनेमात काजोल झळकली होती. इतकचं नाही तर 1997 साली रिलीज झालेला ‘गुप्त’ या सिनेमात काजोलला नकारात्मक भूमिकेसाठी फिल्मफेअर अवॉर्ड मिळाला होता.
काजोल आणि अजय देवगण यांनी अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर 1999 मध्ये लग्नगाठ बांधली. बॉलिवूडमधील बेस्ट कपल्समध्ये काजोल आणि अजयची गणना केली जाते.


हे हि वाचा – 17 वर्षांहून लहान मुग्धा गोडसेला डेट करताना राहुल देवला वाटत होता संकोच

First Published on: August 5, 2021 11:45 AM
Exit mobile version