“….या मुलांना शोधण्यासाठी मला मदत करा”, सनी लिओनीची पोस्ट चर्चेत

“….या मुलांना शोधण्यासाठी मला मदत करा”, सनी लिओनीची पोस्ट चर्चेत

लोकप्रिय अभिनेत्री सनी लिओनी सध्या तरुणाईच्या गळ्यातील ताईत आहे. सनी मुळात पोर्नस्टार आहे, तिने ‘जिस्म २’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. मात्र अल्पवधीतच तिने तिच्या घायाळ अदांनी प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. आज सनी लिओनीची गणना बॉलिवूडच्या लोकप्रिय अभिनेत्रींमध्ये केली जाते. सनी जेव्हा एडल्ड इंडस्ट्रीत होती तिथे ती नंबर वन होती. मात्र आता बॉलिवूडमधील तिचा बोल्ड अंदाज पाहता इथेही तिचा मोठा चाहतावर्ग निर्माण झाला आहे. तिला पाहण्यासाठी तिचे चाहते धडपडत असतात. तिच्या एका लुकने चाहत्यांच्या काळजाचं पाणी पाणी होऊन जाते. अशातच अचानक सनी येवून तुमच्या समोर उभी राहिली तर काय कराल? असंच काहीसं केरळमधील मुलांसोबत झाले आहे. त्यांनी जे केलं ते पाहून सनीने चक्क चाहत्यांकडे त्यामुलांना शोधण्याचे आवाहन केले आहे.

सनी नुकतीच तिच्या पती आणि मुलांसोबत केरळमध्ये गेली आहे. केरळमधील निसर्गसौंदर्याचा आनंद घेण्यासाठी ती एका बोटीने समुद्र सफारीसाठी गेली. या सफरीदरम्यान सनीला एक आगळा वेगळा अनुभव आला. समुद्रात असताना सनीच्या बोटीशेजारी एक छोटी होडी आली आणि त्या होडीमधील मुलांनी सनीला अचानक पाहताच त्यांच्या आनंदाला पारावर उरला नाही. ते सगळे सनीचे नाव घेत तिचे फोटो काढू लागले. तसेच तिला चिअर करण्यासाठी ओरडू लागले. या घटनेनंतर सनीने त्यांचा एक फोटो ट्विटरवर शेअर करत चाहत्यांकडे मदत मागितली आहे. तिने हा फोटो शेअर करत, ”हा फोटो व्हायरल करा आणि या प्रेमळ चाहत्यांना शोधण्यासाठी माझी मदत करा. जेणेकरुन मी त्यांना भेटू शकेन.” अशी पोस्ट सनीने ट्विटरवर शेअर केली आहे.


हे वाचा- देवीचा फोटो असलेला जॅकेट घातल्याने देसी गर्ल पुन्हा ट्रोल…

First Published on: May 12, 2021 4:58 PM
Exit mobile version