ड्रिम गर्ल हेमा मालिनीला ‘हॅप्पी बर्थडे’!

ड्रिम गर्ल हेमा मालिनीला ‘हॅप्पी बर्थडे’!

हेमा मालिनी

हिंदी सिनेसृष्टीत आपल्या सौंदर्य आणि अभिनयाने मोहिनी घालणाऱ्या ड्रिम गर्ल हेमा मालिनीचा आज, १६ ऑक्टोबर रोजी ७० वा वाढदिवस आहे. वर्षानुगणित त्यांच्या वयाचा आकडा वाढत जात असला तरी त्यांचे सौंदर्य आणि तारुण्य मात्र युवतींनाही लाजवेल असेच आहे. चित्रपट, क्लासिकल डान्सर आणि राजकीय नेत्या अशा विविध क्षेत्रात आपल्या कौशल्याने प्रेक्षकांना भुरळ घालणाऱ्या हेमा मालिनी यांना त्यांच्या चाहत्यांकडून भरभरुन शुभेच्छा दिल्या जात आहेत. त्यांच्या वाढदिवसानिमित्त हेमाजींच्या लाईफवर एक झटपट नजर टाकूया.

हेमा मालिनी आणि राज कपूर सपनो के सौदागर चित्रपटात

वयाच्या १४ व्या वर्षी सिने क्षेत्रात पदार्पण

चेन्नईमध्ये जन्मलेल्या हेमा मालिनी यांनी वयाच्या १४ व्या वर्षापासून सिनेक्षेत्रात प्रवेश केला. १९६१ साली त्यांची पहिली तेलुगु फिल्म ‘पांडव वनवासन’ प्रदर्शीत झाली. त्यानंतर १९६८ साली शोमन राज कपूर यांच्या ‘सपनो का सौदागर’ मध्ये त्यांनी आपल्यापेक्षा २४ वर्षांनी मोठ्या असलेल्या राज कपूर यांच्यासोबत कामा केले. तो त्यांचा पहिला हिंदी सिनेमा ठरला. त्यावेळी हेमा या केवळ २० वर्षांच्या होत्या.

हेमा मालिनी आणि देव आनंद

देव आनंदसोबतचा पहिला हिट सिनेमा

७० च्या दशकातील दिग्गज कलाकार अभिनेता, दिग्दर्शक देव आनंद यांचा ‘जॉनी मेरा नाम’ या चित्रपटात हेमा मालिनी यांनी प्रमुख भूमिका साकारली. हा त्यांचा पहिला हिट चित्रपट ठरला. त्यांनतर त्यांनी अनेक एकामागोमाग एक हिट सिनेमे दिले. हेमा आणि धर्मेंद्र यांची जोडी प्रेक्षकांची लोकप्रीय ठरली होती. १९७० च्या काळात या जोडीला हिट सिनेमाचा फॉर्म्युला मानल जात होत. दोघांनी एकूण २७ चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं. त्यातील १६ सिनेमे सुपरहिट ठरली.

हेमा मालिनी आणि संजीव कुमार

डबल रोलचा धमाका

‘सीता और गीता’ चित्रपटातून हेमा मालिनी यांच्या अभिनयाची ताकद प्रेक्षकांपर्यंत पोहोचली. त्यात केलेल्या विनोद, अॅक्शन, इमोशन, ड्रामामुळे त्या लोकप्रीय ठरल्या. शिवाय ड्रिम गर्ल चित्रपटातील त्यांच्या सौंदर्याने कित्येकांना घायाळ केले. या चित्रपटापासून त्यांना सिनेसृष्टीतील ‘ड्रिम गर्ल’ हे नाव पडले.

First Published on: October 16, 2018 10:35 AM
Exit mobile version