हीना खान पुन्हा एकदा कपड्यांवरून झाली ट्रोल

हीना खान पुन्हा एकदा कपड्यांवरून झाली ट्रोल

अभिनेत्री हिना खान

हीना खान ही छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध सून. ‘अक्षरा’ म्हणून ८ वर्ष लोकांचं मनोरंजन केल्यानंतर हीनानं दोन रियालिटी शो मधून स्वतःला सिद्ध केलं. हीनाचा ‘भासूडी’ हा पहिलाच म्युझिक व्हिडिओ लाँच झाला आहे. याचा टीझर तिनं पाच दिवसांपूर्वी आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून रिलीज केला होता. १७ जुलैला या व्हिडिओचं प्रमोशन करण्यासाठी दिल्लीला गेली होती. यावेळी तिनं घातलेल्या फॅशनबेल कपड्यांमधील लुक आपल्या अकाऊंटवर पोस्ट केला. या पोस्टनंतर पुन्हा एकदा हीनाला ट्रोल करायला सुरुवात केली. ‘तू नक्की मुस्लीम आहेस ना?’ अशा तऱ्हेनं अगदी खालच्या पातळीवर जाऊन लोकांनी हीनाला ट्रोल केलं आहे. तर काही लोक तिच्या या नव्या लुकवर फीदा आहेत. ‘लुकिंग सो स्टायलिश. बेस्ट ऑफ लक’ असंही एका चाहत्यानं लिहिलं आहे. दरम्यान अशा तऱ्हेनं अभिनेत्रींना धर्मांवरून ट्रोल करण्याचा प्रकार नवा नाही. तरीही यावर अजून हीना खाननं कोणतीही प्रतिक्रिया अजूनपर्यंत दिलेली नाही. मात्र हीना नेहमीच आपल्या अकाऊंटवरून अशा तऱ्हेचे फोटो पोस्ट करत असते.

हीनाचा व्हिडिओमध्ये नवा अवतार

व्हिडिओच्या टीझरमधून हिनाचा नवा अवतार मोठा धमाका निर्माण करणार असल्याचं दिसत आहे. आतापर्यंत हिनाला नेहमीच सालस सुनेच्या अवतारात पाहिलं गेलं आहे. मात्र या गाण्यात तिनं शॉर्ट्स आणि डेनिम जॅकेट घातलं असून ती या लुकमध्ये बोल्ड आणि सिजलिंग दिसत आहे. इतकंच नाही तर या व्हिडिओमध्ये तिनं स्वतः गाणं गायलं आहे. हिनानं याआधीही ‘बिग बॉस’ आणि ‘खतरों के खिलाडी’ मधून आपल्या आवाजाची झलक प्रेक्षकांना दिली होती. सलमान खाननंदेखील तिच्या आवाजाची स्तुती केली होती. या म्युझिक व्हिडिओला प्रीत हुंडायनं संगीत दिलं असून सोनू ठकुरालनं गायलं आहे. तर रॉबी सिंहनं या व्हिडिओचं दिग्दर्शन केलं आहे. पंजाबच्या पटियाळामध्ये या व्हिडिओचं चित्रीकरण करण्यात आलं आहे.

First Published on: July 17, 2018 6:33 PM
Exit mobile version