‘हीना खान’बाबत ‘ही’ फेक न्यूज झाली प्रसिद्ध

‘हीना खान’बाबत ‘ही’ फेक न्यूज झाली प्रसिद्ध

हीना खान

हीना खान आणि कॉट्रोव्हर्सी याचे नाते जूने आहे. अनेक कारणावरुन हीना नेहेमीच चर्चेचा विषय ठरते. कधी कपड्यावरुन ट्रोल होते तर कधी नव्या अंदाजामुळे ती बातम्यांमध्ये झळकते. मात्र हीनाने फसवणूक केल्याचा आरोप असल्याची बातमी प्रसारमाध्यमांमध्ये प्रकाशीत झाल्यानंतर तिने आरोप फेटळला आहे. याबद्दल ट्विटकरुन आपल्याला या बद्दल कल्पनाच नसल्याचे तिने सांगितले आहे. त्यामुळे प्रसारित झालेली न्यूज फेक असल्याचा दावा हीनाने केला. नुकताच हीनाचा ‘भासूडी’ हा पहिलाच म्युझिक व्हिडिओला लोकांनी चांगला प्रतिसाद दिला होता. “ये रिश्ता क्या कहेलाता है.” या मालिकेमधून हीनाला प्रसिद्धी मिळाली असून तिने बिग बॉसमध्येही सहभाग घेतला होता.

काय आहे प्रकरण?
मीडिया रिपोर्टच्या अनूसार हीनाने ज्वेलरी कंपनीशी फसवणूक केल्यामुळे तिला कायदेशीर नोटीस बजावण्यात आली होती. या नोटीसअंतर्गत हीना विरोधात १२ लाख रुपायांचा दावा ठोकण्यात आल्याचे वृत्त प्रकाशिक करण्यात आले. यानंतर हीनाने आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर लिहिले की,”कायदेशीर नोटीस अद्याप माझ्या घरा पर्यंत पोहचलेली नसून मीडिया हाऊसेसच्या घरात पोहचली. माझ्या क्षत्रूंची ही युक्ती काम करणार नाही…काही तरी नवीन प्रयत्न करा…भासूडी चमकणारच.”

 

दरम्यान हीना “कसोटी झिंदगीकी” या मलिकेच्या रिमेकमध्ये कोमलिकाच्या भूमिकेत दिसू शकेल. या बाबत ती नुकतीच एकता कपूर ला भेटली आहे मात्र अद्याप या बद्दल काही अधिकृत घोषणा करण्यात आली नाही. तसेच या मालिकेत एरिका फर्नांडिंस प्रेरणाच्या भूमिका साकारणार आहे मात्र अनूरागच्या भूमिकेसाठी अद्याप कोणीही मिळाले नसल्याचे सांगण्यात येत आहे.

First Published on: July 19, 2018 3:44 PM
Exit mobile version