कोरोना व्हायरसमुळे चित्रपटसृष्टीवर गेले काही महिन्यांपासून शोककळा पसरली होती. जस-जसा कोरोनाचा कहर ओसरताना दिसत आहे. तशी चित्रपट सृष्टीदेखील प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यास सज्ज होत आहे. नुकतच लोकांना खळखळून हसवण्यासाठी एक जबरदस्त कॉमेडी सिनेमा (Comady Film) प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 2003 साली आलेला ‘हंगामा’ या सिनेमाचा सीक्वल ‘हंगामा 2’ (Hungama 2), 23 जुलैला रिलीज होणार आहे.तसेच चित्रपटाच्या रिलीज पुर्वीच सिनेमाच्या ट्रेलरने लोकांना हसवून-हसवून लोट पोट करण्यास सुरूवात केली आहे. (Hungama 2 Trailer out) सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉमवर सिनेमाचा धमाकेदार ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. फिल्म ‘हंगामा-2’ डिज्नी प्लस हॉटस्टार (Disney+ Hotstar) वर रिलीज करण्यात येणार आहे. कोरोना व्हायरसचे सावट अद्याप कायम असल्यामुळे प्रेक्षकांची सुरक्षितता लक्षात घेत सिनेमाच्या मेकर्सने ओटीटी प्लॅटफॉमवर सिनेमा रिलीज करण्याचा निर्णय घेताला आहे.
ट्रेलर पाहा-
हे हि वाचा – रणवीरच्या अतरंगी स्टाईलवर होताहेत भन्नाट मीम व्हायरल