ती पोस्ट जुनी, मी ठणठणीत- आलिया भट्ट

ती पोस्ट जुनी, मी ठणठणीत- आलिया भट्ट

बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट ही सध्या तिच्या ‘गंगूबाई काठियावाडी’ या चित्रपटाच्या चित्रिकरणात व्यस्त आहे. संजय लिला भन्साळी दिग्दर्शित या चित्रपटाच्या चित्रिकरणादरम्यान तिचा सेटवर अपघात झाल्याचे दोन दिवसांपूर्वी समोर आले होते. आलियानेच तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर ह्या संबंधी पोस्ट केली होती. पण आता तिने आपण ठणठणीत असल्याची  इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर केली आहे.

दोन दिवसांपूर्वीच्या  पोस्टमध्ये तिने पाठीला दुखापत झाल्याचे सांगितले होते. या पोस्टमध्ये तिच्या लाडक्या ‘एडी’ या मांजरीबरोबर तिने फोटो शेअर केला होात. तसेच अंगावर ब्लॅंकेट घेतलेली आलिया ही त्रासलेली दिसत होती. पोस्टमध्ये तिने तिला दुखापत झाल्याचे म्हटले होते. पण आता मात्र तिने अजून एक पोस्ट शेअर केली असून त्यात तिने तिच्या सर्व चाहत्यांना या पोस्टमुळे झालेला गैरसमज दूर केला आहे. तिला झालेली ही दुखापत खूप जुनी आहे असे लिहिले असून ‘शुटींगदरम्यान मला हा त्रास पुन्हा सुरु झाला आहे व माझ्या जुन्या दुखण्याने पुन्हा डोके वर काढल्याचे तिने सांगितले आहे’. त्याचबरोबर मला काहीही झाले नाही आहे. मी बरी आहे आणि पुढच्यावेळी माझ्याबरोबर काय झाले आहे ह्यावर लांबलचक लेख छापण्याआधी त्याची खात्री करण्याचा सल्ला तिने युजर्सला दिला आहे.

आलियाने काही दिवस आराम केला असून विश्रांती घेतल्यामुळे ती आता ठीक आहे. आजपासून पुन्हा शुटींगला सुरुवात करत असल्याचे तिने सांगितले आहे. आणि ती लवकरच बरी व्हावी असे मेसेज केलेल्या चाहत्यांचे तिने आभार मानले आहेत.

 

First Published on: January 21, 2020 6:03 PM
Exit mobile version