‘मी बेरोजगार असून गेल्या दहा वर्षांपासून या आजाराशी लढा देतेय..’ ,सुमोना चक्रवर्तीची भावनिक पोस्ट

‘मी बेरोजगार असून गेल्या दहा वर्षांपासून या आजाराशी लढा देतेय..’ ,सुमोना चक्रवर्तीची भावनिक पोस्ट

लोकप्रिय ‘द कपिल शर्मा शो’ या कार्यक्रमाने सुरु झाल्यापासून प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले आहे. कार्यक्रमातील सर्व कलाकारांनी प्रेक्षकांच्या मनोरंजनात कोणतीच कसर सोडली नाही. संपूर्ण कलाकारांनी रसिकमंडळींचीच नाहीतर सिनेसृष्टीतील कलाकारांचीदेखील भरभरुन पसंती मिळवली आहे. या कार्यक्रमातील इतर कलाकारांप्रमाणे भूरी ही भूमिका साकारणारी अभिनेत्री सुमोना चक्रवर्तीला देखील ‘द कपिल शर्मा शो’ मुळे चांगलीच प्रसिद्धी मिळाली होती. मात्र आता सुमोनाने तिच्या वैयक्तिक आयुष्याबाबत एक खुलासा केला आहे. सध्या ‘द कपिल शर्मा शो’ हा कार्यक्रम बंद झाल्यामुळे सुमोना कडे कोणतेही काम नाही आहे. यासंबंधी इंन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर करत सुमोनाने भली मोठी पोस्ट शेअर केली आहे. सोबतच १० वर्षापासून ती संघर्ष करत असलेल्या आजाराविषयीही तिने सांगितले आहे. पोस्ट शेअर करत सुमोनाने असे लिहिले होते की, ‘बर्‍याच दिवसानंतर मी घरी एक योग्य व्यायाम केला. असे काही दिवस होते की जेव्हा मला मी अपराधी असल्याचे वाटायचे. मी बेरोजगार आहे पण तरीही मी स्वत: ला आणि माझ्या कुटुंबाला खायला देण्यास सक्षम आहे. हा एक प्रीवीलेजच आहे. पण तरीही कधीकधी मला मी दोषी वाटते. विशेषत: जेव्हा मी पीएमएस (प्रीमेन्स्ट्रूअल सिंड्रोम) मुळे निराश होतो. मूड स्विंगमुळे मला भावनिक त्रास होतो.’ काही गोष्टी यापूर्वी मी कधीही सांगितल्या नाही आहे. मी २०११ पासून एंडोमेट्रियोसिसशी झुंज देत आहे. कित्येक वर्षापासून मी याच्या चौथ्या टप्प्यावर आहे. योग्य खाणे, व्यायाम करणे आणि मुख्य म्हणजे कोणताही ताण न घेता माझे आरोग्य ठीक आहे.


हे वाचा- ‘राधे’ चित्रपटाची रेकॉर्ड तोड ओपनिंग, ‘राधे’ 4.2 मिलियन व्युजनुसार सर्वात जास्त पाहिला जाणारा चित्रपट !

First Published on: May 15, 2021 2:05 PM
Exit mobile version