आजारावर मात केल्यानंतर सोनाली बेंद्रेने केले फोटोशुट

आजारावर मात केल्यानंतर सोनाली बेंद्रेने केले फोटोशुट

अभिनेत्री सोनाली बेंद्र

बॉलिवूड अभिनेत्री सोनाली बेंद्रे ही अभिनय आणि सुंदरतेमुळे फॅन्समध्ये चर्चेत होती. मात्र आता ती अनेक लोकांना प्रेरणा देते आहे. सोनालीला कॅन्सर झाल्याच्या बातमीने तिच्या फॅन्सला आश्चर्यात टाकले होते. मात्र ज्या प्रकारे सोनालीने उपचाराला प्रतिसाद दिला आहे ती एक प्रेरणास्थान बनली आहे. सकारात्मक विचारांबरोबर तिने आपल्या उपचाराबद्दल नेहेमी माहिती दिली आहे. तिच्या आत्मविश्वासामुळे अनेकजण प्रोत्साहित झाले. उपचारानंतर सोनालीचा कॅन्सर बरा झाला असल्याचे सांगण्यात येत होते. नुकताच सोनालीने एक फोटो शुट केला आहे यामध्ये तिने स्वतःला सुंदर म्हणून घेतले आहे. या फोटोशुटमधील एका फोटोमध्ये सोनालीने आपल्या ऑपरेशनचे टाके दाखवले आहेत. तिचे हो फोटोशुट सोशल मीडियावर व्हायर झाले. फॅन्सने सोनालीच्या या फोटोंचे कौतुक केले आहे. सोनालीमुळे अनेकांना प्रेरणा मिळेल अशा कमेंट तिच्या फॅन्सने टाकल्या आहे.

 

या फोटोमध्ये सोनालीने Givenchy ब्रँडचे मेटॅलिक ड्रेस घातली आहे. या ड्रेसमध्ये सर्जरीमध्ये झालेला कट दिसतो आहे. हा कट २० इंचचा आहे. कोणत्याही प्रकारचा न्युनगंड न पाळता तिने हा फोटो शेअर केला आहे.

First Published on: March 6, 2019 3:48 PM
Exit mobile version