“मलाही चांगले उपचार मिळाले असेत तर…….वाचलो असतो”, मृत्यूपूर्वी राहुल वोहारची निराशदायक पोस्ट

“मलाही चांगले उपचार मिळाले असेत तर…….वाचलो असतो”, मृत्यूपूर्वी राहुल वोहारची निराशदायक पोस्ट

अभिनेता राहुल वोहराचे कोरोनाने निधन, मृत्यूच्या एकदिवस आधी शेअर केली निराशदायक पोस्ट
अभिनेता राहुल वोहरा याचा रविवारी ९ मे रोजी कोरोनामुळे दिल्लीतील रुग्णालयात मृत्यू झाला आहे. मृत्यूच्या एक दिवस आधी राहुल याने योग्य उपचार न मिळाल्याबद्दल निराशजणक पोस्ट शेअर केली होती. “मलादेखील चांगली ट्रिटमेंन्ट मिळाली असती तर मीही वाचलो असतो, तुमचा राहुल वोहरा” असे म्हणत निराशादायक पोस्ट राहुलने त्याच्या फेसबुकवर शेअर केली होती. या पुढे तो म्हणाला, “मी पुन्हा जन्म घेईल आणि चांगले काम करुन दाखवेल माझ्यात अजून लढण्याची हिंमत नाही आहे, आता मी हारलो असून मी सर्व धैर्य गमावले आहे” राहुलची कोरोनाचाचणी पॉझिटिव्ह आली होती. त्याच्या शरीरातील ऑक्सिजनची कमतरता निर्माण झाली होती. दरम्यान त्याने ऑक्सिजन बेडसाठी एक असहाय्य विनंतीदेखील केली होती.

First Published on: May 9, 2021 7:38 PM
Exit mobile version