Malaika Arora: कार अपघातानंतर मलायकाला मिळाला रुग्णालयातून डिस्चार्ज

Malaika Arora: कार अपघातानंतर मलायकाला मिळाला रुग्णालयातून डिस्चार्ज

बॉलिवूडमधील मोस्ट स्टायलिश (Most stylish) आणि गॉर्जियस (Gorgeous) मलायका अरोरा हिला पाहता लाखो चाहते घायाळ होतात. काल, शनिवारी अभिनेत्री मलायका अरोरा (malaika Arora) हिचा आपघात झाल्याचे समोर आले होते. त्यानंतर तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. सुदैवाने या अपघातामध्ये तिला जास्त दुखापत झाली नाही. मलायकाला डॉक्टराच्या निरीक्षणाखाली ठेवण्यात आले होते, आता तिला डिस्चार्ज (Discharge) देण्यात आला आहे.

मलायका अरोराचा अपघात खोपोली एक्सप्रेसवेवर (Khopoli Expressway) झाला होता. तिला उपचारांसाठी नवी मुंबईमधील अपोलो रुग्णालयात (Apollo Hospital) नेण्यात आले होते. या अपघातामध्ये तिला जास्त दुखापत झाली नाही. रुग्णालयात दाखल केल्यानंतर मलायकाचे सीसी स्कॅन करण्यात आले. याचा रिपोर्ट चांगला आला असला तरी तिला रात्रभर रुग्णालयामध्ये निरीक्षणाखाली ठेवण्यात आले होते. आता मलायकाला डिस्चार्ज दिला असून ती पुन्हा घरी परतली आहे. याआधी मलायकाची बहीण अमृता अरोरा (Amrita Arora) हिने मलायकाची तब्येत ठीक असल्याची माहिती दिली होती. मलायका अरोराच्या मैत्रिणीने सांगितले की, मलायकाला टाके पडले असून ती आता बरी आहे.

मात्र या अपघातामुळे तिला धक्का बसला असल्याचे त्यांनी सांगितले. तिच्या डोक्याला थोडा मार लागला आहे. जेव्हा हा अपघात झाला तेव्हा ती तिच्या रेंज रोवर (Range Rover) गाडीमध्ये होती. तिची गाडी दोन गाड्यांमध्ये फसल्याने हा अपघात झाल्याचे सांगितले. दरम्यान मलायका अरोराच्या तब्येतीमध्ये सुधारणा झाल्याचे समजता तिच्या चाहत्यांच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण झाला आहे.


हेही वाचा – ‘जर्सी’च्या रिलीजपूर्वी शाहिद कपूरने खरेदी केली नवी लग्झरी कार, किंमत वाचून व्हाल हैराण


First Published on: April 3, 2022 4:24 PM
Exit mobile version