‘टायगर 3’मध्ये खलनायकाच्या भूमिकेत दिसणार इम्रान हाशमी

‘टायगर 3’मध्ये खलनायकाच्या भूमिकेत दिसणार इम्रान हाशमी

बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या चित्रपटाची चर्चा ही सिनेमाची घोषणा केल्यानंतर तूफान रंगू लागते. त्याचा आगामी चित्रपट कोणता असेल यासाठी प्रेक्षक उत्सुक असतात. सध्या सलमान खान याच्या ‘टायगर 3’ या चित्रपटाची सगळीकडे हवा आहे. या सिनेमात अभिनेत्री कॅटरीना कैफ सोबत एका गुप्तहेराच्या भूमिकेत दिसून येणार आहे. याचे चित्रीकरण सध्या मुंबईमधील यशराज स्टुडिओ मध्ये करण्यात येत आहे. या चित्रपटात सलमान खानला टक्कर देण्यासाठी इम्रान हाशमी हा खलनायकाच्या भूमिकेत दिसून येणार आहे. इम्रान रोल ‘टायगर 3’ मध्ये कसा दिसणार आहे याबाब माहिती समोर आली आहे.

कशी असणार इम्रानची ‘टायगर 3’ मध्ये भूमिका –
पिंकविलाच्या सोर्स नुसार इम्रान हाशमी एका पाकिस्तानी एजंटचा रोल निभावणार आहे. इम्रानचे कॅरेक्टर खूप स्मार्ट दाखवले जाणार आहे. त्याचा लुक आत्तापर्यंत निभावलेल्या नेगेटिव्ह शेड्स पेक्षा हटके आणि स्टायलिश असणार आहे.
चित्रपटाच्या शूटिंग बद्दल बोलायचे झाल्यास जून महिन्या पासून शूटिंग सुरू होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आदित्य चोप्रा यांनी युरोपमधील काही जागा शूटिंग साथी बुक केल्या आहेत. तसेच काही भागाचे शूटिंग युरोप मध्ये झाले आहे असे बोलण्यात येत आहे. हा एक बिग बजेट सिनेमा असणार आहे 350 कोटी रुपये सिनेमासाठी खर्च केले असल्याचे बोलले जात आहे. सध्या मुंबई मध्ये झालेल्या वादळामुळे गोरेगाव मध्ये ‘टायगर 3’ च्या सेटचे भारी नुकसान झाले आहे. यामुळे कदाचित शूटिंग लांबण्याची शक्यता वर्तवली जात आहे.


हे हि वाचा –आदित्य नारायणच्या ‘त्या’ वक्तव्यावर मनसेचा आक्षेप, काय आहे नेमके प्रकरण ?

First Published on: May 24, 2021 4:33 PM
Exit mobile version