2023 मध्ये देखील मायथॉलॉजीवर आधारित ‘हे’ चित्रपट होणार प्रदर्शित

भारतीय चित्रपटांमध्ये विविध विषयांव्यतिरिक्त मायथॉलॉजीवर आधारित चित्रपट बनवण्यास निर्माते नेहमीच प्राधान्य देतात. अशा चित्रपटांमध्ये आपला धर्म, संस्कृती आणि परंपरा यांच्या खास संबंध जोडलेला असतो. त्यामुळे प्रेक्षकही हे चित्रपट आवडीने पाहतात. 2023 मध्ये देखील मायथॉलॉजीवर आधारित बरेच चित्रपट प्रदर्शित होणार आहेत.

2023 मध्ये देखील मायथॉलॉजीवर आधारित ‘हे’ चित्रपट होणार प्रदर्शित

हा चित्रपट महाकवी कालिदास यांच्या ‘अभिज्ञान शाकुंतलम’ या संस्कृत नाटकावर आधारित आहे. या चित्रपटात राजा दुष्यंत आणि शंकुतलाची प्रेम कथा दाखवण्यात आली आहे. चित्रपटात समंथा रुथ प्रभू आणि देव मोहन मुख्य भूमिकेत असणार आहेत. हा चित्रपट 17 फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होणार आहे.

हा चित्रपट रामायणावर आधारित आहे. यात प्रभास आणि कृती सेनन मुख्य भूमिकेत असणार आहेत. प्रभास चित्रपटात श्री रामांची आणि कृती सीतेची भूमिका साकारेल.

नुकत्याच काही महिन्यांपूर्वी या चित्रपटाचा पहिला पार्ट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाची गोष्ट चोल साम्राज्यावर आधारित आहे.

अभिनेता अक्षय कुमार, अजय देवगण, रणवीर सिंह, अनिल कपूर आणि नाना पाटेकर यांच्या दर्जेदार भूमिका असलेला महाभारत चित्रपट देखील यंदा प्रदर्शित होणार आहे.

या चित्रपटात कंगना रानौत मुख्य असणार आहे. हा चित्रपट यंदा हिंदी, कन्नड, तमिळ, तेलुगू आणि मल्याळम भाषेत प्रदर्शित होणार आहे.

मधु मंटेना यांच्या दिग्दर्शनात तयार होत असलेल्या द्रौपदी चित्रपटात दीपिका मुख्य भूमिकेत असणार आहे.

या चित्रपटात साउथ अभिनेता विक्रम मुख्य भूमिका साकारताना दिसेल. हा चित्रपट हिंदी, कन्नड, तमिळ, तेलुगू आणि मल्याळम भाषेत प्रदर्शित होणार आहे.

First Published on: January 3, 2023 4:47 PM
Exit mobile version