मालदीवमध्ये मुलीला सोबत घेऊन अनुष्का शर्माने चालवली सायकल

मालदीवमध्ये मुलीला सोबत घेऊन अनुष्का शर्माने चालवली सायकल

अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि क्रिकेटपटू विराट कोहली या दोघांनाही पॉवर कपल म्हणून ओळखले जाते. अनुष्का शर्मा सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. तसेच ती वारंवार आपल्या सोशल मीडियावरून अनेक फोटो, व्हिडीओ शेअर करत असते. नुकतेच तिने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर मालदीव येथील काही फोटो आणि व्हिडीओ शेअर केले आहेत. यातील एका व्हिडीओमध्ये अनुष्का सायकल चालवत आहे आणि तिच्या पाढीमागे तिने वामिकाला बसवलेले आहे.

अनुष्काने शेअर केला व्हिडीओ
अनुष्का शर्माने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये ती मालदीवच्या जंगलामध्ये आणि रिसॉर्टच्या मध्ये सायकल चालवताना दिसत आहे. तसेच तिच्या पाठीमागे तिने वामिकाला बसलेले आहे. मात्र या व्हिडीओमध्ये वामिकाचा चेहरा दिसत नाही. या व्हिडीओखाली अनुष्काने कॅप्शन सुद्धा दिले आहे, त्यात तिने लिहिलंय की, “माझ्या प्रिय व्यक्तींसोबतच्या खास आठवणी, मला परत घेऊन चला”.

First Published on: June 19, 2022 5:41 PM
Exit mobile version