आशुतोष राणा पुन्हा हवालदार

आशुतोष राणा पुन्हा हवालदार

Ashutosh Rana

पूर्वी बॉलिवूडमध्ये खलनायिकी भूमिका करणार्‍यांची वेगळी फळी होती. आता अभिनेतासुद्धा खलनायिकी भूमिका साकारत असल्यामुळे कोणा एकाकडे बोट दाखवून हा खलनायक आहे असे सांगता येत नाही. बॅडमॅन, मोगॅम्बो, गब्बर ही नावे घेतल्यानंतर खलनायक कोण हे ओळखायला फारशी अडचण येत नाही. आशुतोष राणा याचा चित्रपटातील जीवन प्रवास लक्षात घेतला तर नकारात्मक भूमिका त्याने अनेक केलेल्या आहेत. माणसातला विक्षिप्त माणूस दाखवण्यात तो यशस्वी झालेला आहे. मराठीतला ‘वेडा’ हा चित्रपट तेवढ्याच कारणासाठी गाजला होता. यंदाचं वर्ष त्याच्यासाठी खास असणार आहे. लागोपाठ दोन वेळा हवालदारची भूमिका साकार करायला त्याला मिळालेली आहे.

रोहित शेट्टीच्या ‘सिम्बा’ मध्ये तो हवालदार म्हणून दिसला होता. आता अभिषेक चौबेच्या ‘सोनचिडीया’ या चित्रपटात पुन्हा हवालदार म्हणून दिसणार आहे. अर्थात तो यातून हवालदारची चांग़ली प्रतिमा दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. या चित्रपटाचे आतापर्यंत दोन ट्रेलर प्रकाशित झाले. दुसर्‍या ट्रेलरमध्ये आशुतोष दिसतो. साधारण १९७० साली भारताच्या विविध भागात डाकूंचे जबरदस्त प्रस्त होते. पोलिसांना त्यांना आळा घालणे कठीण जात होते. विरोध केला तर मृत्यूशिवाय पर्याय नाही, त्यामुळे कोणी पोलीस पुढे सरसावून त्यांचा बंदोबस्त करत नव्हता. ज्यांनी हिंमत दाखवली अशा जाबांज पोलिसाची व्यक्तीरेखा आशुतोष करणार आहे. चित्रपटातील कथा ही मध्य प्रदेशातील आहे.

First Published on: February 18, 2019 5:25 AM
Exit mobile version