‘इंडिया रिस्पेक्ट चाहता है!’, गाणं रिलीज

‘इंडिया रिस्पेक्ट चाहता है!’, गाणं रिलीज

नवं गाणं रिलीज (सौ. युट्यूब)

स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने ‘इंडिया रिस्पेक्ट चाहता है!’ हे नवं कोर गाणं रिलीज झाले आहे. गायक शान, सोनू निगम, शंकर महादेवन आणि श्रेया घोषाल यांनी हे गाण गायले आहे. ‘भारताला आदर अपेक्षित आहे’, असे या गाण्याचे बोल असून ५ दिवसांपूर्वी या गाण्याचे टीझर आले होते. त्यानंतर हे संपूर्ण गाणे कधी येणार अशी उत्सुकता चाहत्यांमध्ये होती. आता ही प्रतिक्षा संपली असून हे गाण युटयुबवर रिलीज झाले आहे.

पाहा व्हिडिओ

(सौ. युट्यूब)

गाण्यातून संदेश

गाण्यातून महिला आदर राखा, भेदभाव विसरा, भ्रष्टाचारमुक्त भारत, दहशतवादाची पाळेमुळे मुळासकट उपटून काढण्यासाठी एकत्र व्हा असा संदेश देण्यात आला आहे. या गाण्यामध्ये जोश आणते ते वंदे मातरमचे बोल… त्यामुळे हे गाणे शेवटपर्यंत रोखून धरते.

अॅनिमल अँथममधून एक वेगळा प्रयत्न

इंडिया रिस्पेक्ट चाहता है!, या गाण्याआधी आलेले एक गाणे देखील एक वेगळा प्रयत्न होता. निसर्गाचा वाढता ऱ्हास पाहता प्राण्याची संख्या दिवसेंदिवस कमी होत चालली आहे. पण ही प्राणी संपदा आपली अमूल्य संपत्ती असून त्यांची रक्षा करणे आपले काम आहे. हे या गाण्यातून दाखवण्यात आले आहे. हे गाणे श्रेया घोषाल, सुनिधी चौहान, बेनी डायल, विशाल दधलानी,क्लिंटन सेरेजो यांनी गायले आहे.

(सौ. युट्यूब)

First Published on: August 13, 2018 2:03 PM
Exit mobile version