एस श्रीसंत आता हिंदी बिग बॉसमध्ये खेळणार नवी इनिंग!

एस श्रीसंत आता हिंदी बिग बॉसमध्ये खेळणार नवी इनिंग!

श्रीसंतची बिग बॉसमध्ये एन्ट्री

मनोरंजनाचा तिसरा डोळा म्हणजे बिग बॉस. बिग बॉसने चाहत्यांचं जितकं मनोरंजन केलं, तेवढाच तो शो वादग्रस्तही ठरला. स्पर्धकांचं वागणं, टास्क, अश्लीलता यावरून हा शो कायम चर्चेत राहिला. तरीही या शोच्या चाहत्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच गेली. बिग बॉस १२ची घोषणा झाली आणि यामध्ये कोणते कलाकार असणार? या विषयी चर्चा रंगू लागल्या. बिग बॉस १२च्या लाँचिंगच्या दिवशी बिग बॉस १२ चा होस्ट सलमान खानने बिग बॉसच्या घरातील भारती सिंग आणि हर्ष लिंबाचिया ही पहिली जोडी जाहीर केली. आता क्रिकेटर श्रीसंत हा देखील बिग बॉसच्या घऱात येणार असल्याची चर्चा आहे.

मॅच फिक्सिंगमुळे श्रीसंत चर्चेत

मॅच फिक्सिंगमुळे क्रिकेटर श्रीसंतचं नाव वादात आलं होतं. आयपीएल २००८ मध्ये राजस्थान रॉयलसाठी खेळताना स्पॉट फिक्सिंगमध्ये सहभागी झाल्यामुळे श्रीसंतच्या खेळण्यावर कायमस्वरूपी बंदी घालण्यात आली होती. न्यायालयीन सुनावणीनंतर त्याला सोडण्यात आले. यादरम्यान, श्रीसंतने ‘अक्सर २’ आणि ‘टीम ५’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. चित्रपटात काम केल्यानंतर श्रीसंतने २०१४ मध्ये छोट्या पडद्यावरही एन्ट्री घेतली. ‘खतरों के खिलाडी’ आणि ‘झलक दिख ला जा’ या रिअॅलिटी शोमध्ये त्याने आपला जलवा दाखवला.

श्रीसंत

श्रीसंतबरोबर या पर्वात नेहा पेंडसे, मिलींद सोमण, अंकिता कुंवर, विभा छिब्बर, सृष्टी रोडे, देवोलिना भट्टाचार्य, रिध्दिमा पंडित, दिव्या अगरवाल, स्कारलेट मीरोज, शुभी जोशी, शालीन भनोट, महिका शर्मा, एस परिछा, गुरमीत देबिना, शोएब-दीपिका, डेनी डी, परम सिंह स्पर्धक म्हणून दिसणार आहे.

बिग बॉसचे आजपर्यंतचे सगळे सीझन हिट ठरले आहेत. बिग बॉसच्या ११ व्या सिझनमध्ये अभिनेत्री शिल्पा शिंदे विजेती झाली होती. मात्र या सीझनमध्ये काही रिअल लाईफ जोड्याही घरात बघायला मिळणार आहेत. बिग बॉस चाहत्यांना बिग बॉसच्या स्पर्धकांची मजा, टास्क पुन्हा एकदा अनुभवता येणार आहे. विशेष म्हणजे यंदा बिग बॉसचा १२ चा सीझन लोणावळ्यात नाही तर गोव्यात होणार आहे.

First Published on: September 7, 2018 12:59 PM
Exit mobile version