लवकरच येणार आनंदीबाईंचा प्रवास रूपेरी पडद्यावर

लवकरच येणार आनंदीबाईंचा प्रवास रूपेरी पडद्यावर

'आनंदी गोपळ' हा बायोपिक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस

ज्या काळात स्त्रीला समाजात तितकस महत्त्व दिल जात नव्हतं. बाईने फक्त चूल, मुल एवढ्यापुरतचं मर्यादीत रहावं लागायचं. मात्र या काळात स्त्रियांनी समाजाविरोधात यशस्वी लढा देत आपलं शिक्षण पुर्ण केलं आहे. यातील एक स्त्री म्हणजे आनंदीबाई जोशी. प्रत्येक यशस्वी पुरूषामागे एक स्त्री असते असं म्हणतात. मात्र आनंदीबाई जोशी यांच्या मागे त्यांचे पती गोपाळ जोशी ठामपणे उभे होते. त्यांच्याच आयुष्यावर आधारीत ‘आनंदी गोपळ’ हा बायोपिक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटाचा टीझर सोशलमिडीयावर प्रदर्शित करण्यात आला आहे.

हे आहे टीझरमध्ये

या बायोपिकमध्ये अभिनेता ललित प्रभाकर गोपाळ जोशी यांच्या भूमिकेत दिसत आहे. तर वयाच्या दहाव्या वर्षी आनंदीबाईंच लग्न गोपाळराव जोशी यांच्याशी झालं आहे. लग्ना आधीच गोपाळरावांनी आनंदीबाईंच्या वडिलांनी एक अट घातली होती. त्या अटीमध्ये ते म्हणाले होते की, मी माझ्या मनाप्रमाणेच आनंदीबाईंना शिकवणार आहे. समाजाचा रोष पत्करून आनंदीबाईंना गोपाळरावांनी शिकवलं. त्याप्रमाणे आनंदीबाईंच्या पाठीशी खंबीरपणे ते उभे राहिले. असा हा चित्रपटाचा पहिला टीझर गोपाळरावांवर आधारीत आहे. मात्र या चित्रपटात आनंदीबाईंची भूमिका कोण साकारणार हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.

गोपाळरावांची भूमिका ललित प्रभाकर साकारणार

आनंदीबाई म्हणजे महारष्ट्रानं देशातल्या प्रत्येक महिलेला दिलेली देणगी असं म्हणतं झी स्टुडिओनंची या चित्रपटाची घोषणा केली आहे. १५ फेब्रुवारीला आनंदीबाईंचा हा प्रवास पडद्यावर येणार आहे. गोपाळरावांची भूमिका ललित साकारत आहे त्यामुळे आता आनंदीबाईंची भूमिका कोण साकारणार याची उत्सुकता सगळ्यांना आहे.

First Published on: January 10, 2019 3:11 PM
Exit mobile version